पिडीलाईट कंपनी विरोधात देशमुख कांबळे ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा !

mahad-tahasildar

महाड  ( मिलिंद माने ) : महाड एमआयडीसी मधील पिडीलाईट कंपनीच्या विरोधात देशमुख कांबळे येथील गणेश रघुनाथ मोरे आणि इतर ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत. मुलाला कामावर घेण्याबाबत आणि आजारी पडल्यानंतर कंपनीकडून दुर्लक्ष केल्याचे मोरे यांनी सांगून यामुळेच आपण हे पाऊल उचलल्याचे सांगितले.
महाड औद्योगिक वसाहती मधील पिडिलाइट हे एक नामांकित कंपनी आहे. पूर्वी ही कंपनी विनायल केमिकल या नावाने ओळखली जात होती. या कंपनीमध्ये देशमुख कांबळे गावाच्या शिंदे कोंड येथील गणेश रघुनाथ मोरे हे कायमस्वरूपी कामाला होते २९/०५/२०११ रोजी गणेश रघुनाथ मोरे हे कंपनीत काम करत असताना त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांना मुंबई येथे सायन हॉस्पिटल, के ई एम हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू करण्यात आले.
उपचार चालू असताना पिडिलाइट कंपनी मार्फत कोणीही लक्ष दिले नाही. कंपनीने औषधोपचाराचा खर्च देखील दिलेला नाही असे गणेश रघुनाथ मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सन २०११ पासून गणेश रघुनाथ मोरे अंथरुणावरच खीळून असल्याने त्यांनी त्यांचा मुलगा मनीष यास कंपनीमध्ये कामाला घ्यावे अशी मागणी केली मात्र तरी देखील सन 2019 पासून त्याला अद्याप कामावर घेतला गेलेला नाही.
कंपनी प्रशासनाला सतत पत्र व्यवहार करून आपल्या मुलाला कामावर सामावून घ्यावे असेच कळवले मात्र कंपनीने मुलाला कंपनीमध्ये घेण्याऐवजी अलीकडे रुपये सात हजार दरमहा पाठवण्यास सुरुवात केली. मुलाची नोकरी अपघाताचा आर्थिक नुकसान भविष्य निर्वाह निधी उपदान इत्यादी बाबत कंपनीने कोणताही विचार केलेला नसल्याने कुटुंबाची उपासमार होत आहे.
यामुळे येत्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून कंपनीच्या प्रवेशद्वारावर गणेश रघुनाथ मोरे यांची संपूर्ण कुटुंब आणि ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत याबाबत महाड तहसीलदार शितोळे यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी देशमुख कांबळे गावातील शशिकांत देशमुख आणि इतर प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading