पिंट्या गायकवाड मित्रमंडळाच्या स्वयंसेवकांचा मंत्री भरत गोगावले यांनी ‘जीवनदूत सन्मान सोहळा २०२५’ हा पुरस्कार देऊन केले सन्मानित

Bharat Ghogavale Jeevan Gaurav Purskar
सोगाव (अब्दुल सोगावकर) :
जिल्हा वाहतूक रायगड शाखेतर्फे ‘रस्ता सुरक्षा सप्ताह २०२५’ निमित्ताने शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ रोजी अलिबाग तालुक्यातील आर. सी. एफ. सभागृह कुरुळ – अलिबाग येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात अपघातग्रस्तांना व नैसर्गिक आपत्ती काळात वेळोवेळी मदत करणाऱ्या पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंढी व युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था चोंढी या संस्थेच्या स्वयंसेवकांचा रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्याहस्ते ‘जीवनदूत सन्मान सोहळा २०२५’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून अपघातग्रस्तांना त्यांचा जीव वाचविण्यासाठी तातडीची मदत करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील पिंट्या गायकवाड मित्रमंडळ, चोंढी व युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था चोंढी या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी व त्यांच्या स्वयंसेवकांनी चोंढी पंचक्रोशी व परिसरात घडलेल्या अपघाताप्रसंगी व विविध आपत्ती प्रसंगी रुग्णवाहिकेसह वेळोवेळी मदतीला धावून जात जनमानसात एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी अपघातावेळी पोलीस प्रशासनाला देखील नेहमी मोलाचे सहकार्य केले व करत आहेत.
यासोबतच अनेक वेळा अपघाताप्रसंगी अथवा एखाद्या अत्यवस्थ असलेल्या अती जोखमीच्या रुग्णांना अलिबाग व मुंबई विभागातील पनवेल, नवी मुंबई, ठाणे तसेच पुणे अश्या विविध रुग्णालयात निश्चित वेळेत उपचारासाठी दाखल करत जीव वाचवण्याचे महान कार्य ते सातत्याने आणि तेही विनामोबदला करत आहेत. यासोबतच एखादा रुग्ण दगावला असला तर त्या दगावलेल्या रुग्णाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून महाराष्ट्रातील त्यांच्या कोणत्याही जिल्ह्यातील त्या गावांतील घरी मोफत घेऊन जाण्याचे महान कार्यही ते करत आहेत, याबद्दल त्यांच्या या माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या महान कार्याची दखल विविध राजकीय व सामाजिक संस्थांनी घेऊन संस्थेचे अध्यक्ष पिंट्या गायकवाड यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक वेळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
आता याची दखल महाराष्ट्र शासनाने व पोलीस प्रशासनाने घेऊन संस्थेचे स्वयंसेवक तसेच रुग्णवाहिका चालक गणपत नाईक व रोशन नाईक यांनी अनेक अपघातग्रस्त व इतर रुग्णांना रुग्णवाहिकेतून वेळेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत जीवदान दिले आहेत, याबद्दल संस्थेचे अध्यक्ष पिंट्या गायकवाड व रुग्णवाहिका चालक यांचे कुरुळ – अलिबाग येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात ‘जीवनदूत सन्मान सोहळा २०२५’ हा पुरस्कार रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी कौतुक केले व त्या सर्वांचा यथोचित पुरस्कार देऊन सन्मानित केले. याबद्दल पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंढी व युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था चोंढी या संस्थेचे अध्यक्ष तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांचे व त्यांच्या सर्व स्वयंसेवकांचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
या पुरस्कार सोहळा कार्यक्रमावेळी अपघातग्रस्तांना व नैसर्गिक आपत्ती काळात मदत करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्ते व संस्थांचे ‘जीवनदूत सन्मान सोहळा २०२५’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अलिबाग, मुरुड, रोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, उपवनसंरक्षक राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा वाहतूक रायगड शाखेच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांनी संस्थेच्या जीवनदूतांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत त्यांना शासनस्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मदत करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना संरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading