दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखिल परतीच्या पावसाने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जवळपास आॅक्टोंबर महिना संपत आला तरी पावसाचा हाहाःकार सुरुच होता. परंतु ४ ते ५ दिवसांपासून सर्वत्र पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे संपुर्ण नागोठणे परिसरामध्ये शेतक-यांची भातकापणीची मोठ्या प्रमाणात लगबग सुरु झालेली दिसुन येत आहे.
परतीच्या पावसाने शेतातील भाताची सर्व रोपे ही जमिनीवर आडवी पडुन सर्वत्र विखुरल्यामुळे भात कापणी करतांना मजुरांचे अक्षरशः कंबरडे मोडत आहेत. भात कापणी करतांना शेतामध्ये पुन्हा नव्याने उगवलेले भाताचे कोंब देखिल अडथळे ठरत आहेत. ज्या ठिकाणी भात कापणीसाठी २ ते ३ दिवस लागायचे त्या ठिकाणी भातकापणी करण्यासाठी ८ ते ९ दिवस लागत आहेत. त्यातच भातकापणीसाठी लागणा-या मजुरांची कमतरता भासत आहे.
बहुतांशी आदिवासी मजुर हे दरवर्षी आपापल्या शेतीची कामे पुर्ण करुन दुसरीकडे मजुरीसाठी जातात. परंतु यावेळी मात्र उशिरापर्यंत सुरु राहीलेल्या पावसामुळे भातकापणीची कामे ही सर्वांची एकदमच निघाल्यामुळे मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यातुनच जरी मजुरकर मिळाले तरी ४०० ते ५०० रु. एका माणसाची मजुरी, दोन वेळच जेवण व चहापाण्यासाठी आणखी वेगळे पैसै असा मोठ्या प्रमाणात खर्च शेतकऱ्यांना मजुरांवर करावा लागत आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारी महागाईची बी बियाणे, मजुरांचा खर्च, व परतीच्या पावसाचा बसलेला फटका अशा सर्व गोष्टींचा विचार करता यापुढे शेती करायची की नाही असा प्रश्न शेतक-यांसमोर निर्माण झाला आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.