
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. बुधवारी (ता.18) कानसळ गावाजवळ नेव्ही कॉलेज समोर बाईकस्वाराने स्कूल बसला धडक दिल्याने तिघेजण ठार झाले. श्रीराज एज्युकेशन सेंटरची बस घोटावडेहून पालीकडे मुलांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. पालीहून खोपोलीच्या दिशेने वेगाने आलेल्या बाईकवरील तिघेजण बसला धडकले.
ही घटना बसच्या पाठीमागून येणाऱ्या कारच्या डॅश कॅमेऱ्यात कैद झाली. अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, उपनिरीक्षक सचिन निकम, आणि सहाय्यक निरीक्षक युवराज सूर्यवंशी यांच्यासह मदत टीम घटनास्थळी पोहचली.
——————————————-
महामार्गावर एक दिवस आधीच (ता.17) दापोडे गावाजवळ एनसीसी विद्यार्थ्यांची बस आणि कारमध्ये अपघात झाला होता. बस शेतात कलंडली, मात्र 45 विद्यार्थी सुखरूप बचावले.