पालीत शेकापचा ७६ वा वर्धापनदिन ! जयंताभाई पाटील काय तोफ डागणार याकडे साऱ्यांचं लक्ष

shekap-vardhapan
कोलाड ( श्याम लोखंडे ) : शेतकरी कामगार पक्षाचा ७६ वा वर्धापन दिन बुधवारी २ ऑगस्ट रोजी सुधागड तालुक्यात श्री तीर्थ क्षेत्र बल्लाळेश्वर पाली नगरीत मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
सदरच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याला छत्रपती संभाजी राजे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाची बुलंद तोफ श्रमजीवी शेतकरी कष्टकऱ्यांचा आवाज राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जयंता भाई पाटील वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रायगडाच्या राजधानीवर पुन्हा नव्यानं काय घडेल का ? एकेकाळी संसदेसह राज्यात शेतकरी कामगार पक्षाची ताकद रायगडच्या राजधानीतून होती जनसामान्य माणसाला न्याय मिळून देणारा शेतकरी कामगार पक्षच एक खासदार सात आमदारांची कमांड असताना कधीही सत्तेची अभिलाषा बाळगली नाही मात्र हाती सत्ता नसतानाही श्रमजीवी शेतकरी कष्टकरी कामगार यांना सातत्याने न्याय हक्कासाठी संघर्षाचा लढा देत त्याचे प्रश्न मार्गी लावणारा शेतकरी कामगार पक्ष रायगडच्या लाल किल्ल्यावर सदैव सत्ता विधिमंडळात जनतेच्या न्यायहकासाठी सरकारला सळो की पळो करून धारेवर धरत विविध प्रश्न सातत्याने पाठपुरावा करत मार्गी लावत असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या उद्या वर्धापन दिनी असल्याने या धर्तीवर जणू कार्यकर्त्यांना पर्वणीच ठरणार आहे.
सद्याच्या परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षापुढे खूप मोठी आवाहने असली तरी उद्याच्या मेळाव्यात पक्षाचे नेते दस्तुरखुद्द आमदार जयंता भाई पाटील कार्यकर्त्यांपुढे काय भूमिका घेतात, गेली दोन ते तीन दशके खासदार नाही आमदारांचे देखील संख्याबळ कमी झाले जिल्हापरिषदेवर एकहाती सत्ता मिळत नाही यावरच साऱ्यांचे लक्ष लागले असून राज्यातील सत्ता संघर्षनाट्यावर काय बोलणार यावरच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
देशासह राज्यातील बळिराजा अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. वाढती महागाईची टांगती तलवार धानाला हमीभाव मिळत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर तर केन्द्र सरकार लक्ष २०२४ च्या निवडणुकीकडे राज्य सरकार दररोज वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. एक वर्षाहून अधिक काळ प्रथमच रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पालिका तसेच महापालिका यावर प्रशासकीय यंत्रणा आहे.
मुंबई गोवा महामार्ग चे काम गेली तेरा वर्ष रकडले, भुसंपादित भू धारकांचा प्रश्न प्रलंबित अद्याप नागोठणे इंदापूर दरम्यानचे शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने रायगडसह कोकणाला पूरपरिस्थितीशी सामना करावा लागला आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे ते ही नुकसाभरपाई च्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे.
पाली लाल बावट्याने सजली आहे तर हजारोंच्या संख्येने जिल्ह्यातील शेकापचे कार्यकर्ते या वर्धापदिनानिमित्त उपस्थीत राहणार आहेत. त्यामुळे आजच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनामित्ताने शेतकरी कामगार पक्षाचे नेते तसेच प्रमुख मान्यवर काय बोलणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे तर पुढील येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडनुकिसाठी शेतकरी कामगार पक्ष काय आपल्या पक्षासाठी काय रणरीती आखणार याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading