पायी गस्त मोहिमेने गुन्हेगारांमध्ये धडकी; Panvel Police On Ground Patrol Mission!

पायी गस्त मोहिमेने गुन्हेगारांमध्ये धडकी; Panvel Police On Ground Patrol Mission!
पनवेल (संजय कदम) :
गेल्या 8 दिवसापासून पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या मार्फत हद्दीच्या वेगवेगळ्या ठिकाणी पायी गस्त मोहिम राबविण्यात येत असल्याने गुन्हेगारांमध्ये चांगलीच धडकी बसली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडघर फाटा ते काळीवाडा, मुसलमान नाका, टपाल नाका, पंचरत्न चौक, सिंधी हॉल, प्रशांत लॉज, गांधी हॉस्पीटल, आमदार निवास, मिडलक्लास सोसायटी, पुरोहित सोसायटी, एसबीआय बँक, बीजेपी कार्यालय, कर्नाळा भाजी मार्केट, जव्हेरी बाजार, जयभारत नाका, लाईन आळी, दि.बा.पाटील शाळा, सावरकर चौक, टिळक रोड, उपजिल्हा रूग्णालय, परदेशी आळी, सावरकर चौक, वडाळे तलाव, अशोक बाग, प्राचीन हॉस्पीटल, प्रांत ऑफीस कडून पनवेल शहर पोलीस ठाणे अशी पायी गस्त करण्यात आली.
या पायी गस्त करिता 1 वपोनी, 1 पोनी, 5 सपोनी/पोउपनि तसेच 19 अंमलदार हजर होते.
यावेळी बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. तसेच वडाळे तलाव परिसरात दुचाकी तसेच चारचाकी वाहने वेगाने चालविणे, वाहतूक कोंडी करणे आदींवर सुद्धा कारवाई करण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांना मार्गदर्शन सुद्धा यावेळी करण्यात आले.
या उपक्रमाचे पनवेलकरांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading