कर्जत ( गणेश पवार ) : उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची पातळी खाली गेली असून अनेक ठिकाणचे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने महिला वर्गासह नागरिक त्रस्त असून असाच पाणी टंचाईचा सामना कर्जत विधानसभा मतदारसंघातील कळंब जिल्हा परिषद विभागातील चिमटेवाडी, मोहपाडा आदिवासी वाडी येथील महिला व ग्रामस्थांना करावा लागत असल्याने येथील पाणी प्रश्न मार्गी लागावा म्हणून ग्रामस्थांनी आपल्या व्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे मांडल्या असता या व्यथेची दखल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी घेत चिमटेवाडी, मोहपाडा आदिवासी वाडी ८ मे २०२३ रोजी बोअरवेल मारुन दिल्याने शिवसेनेच्या कामगिरीचे कौतुक करित उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या सामाजिक बांधीलकीचे ग्रामस्थांनी व महिला वर्गानी कौतुक केले आहे.
याप्रसंगी माजी सभापती पंढरीनाथ राऊत, विभाग प्रमुख लक्ष्मण पोसाटे, विभागप्रमुख लक्ष्मण पोसाटे, समाजसेवक सुमित चंदन, चिमटेवाडी शाखाप्रमुख प्रकाश चिमटे, नांदगाव शाखाप्रमुख संतोष चोखट, मोहपाडा आदिवासी वाडी येथील नारायण करोडे आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शिवसैनिक – युवासैनिक उपस्थित होते.
शिवसेना म्हंटल की ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या ब्रीदवाक्याप्रमाणे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व येथील अन्य शिवसेना पदाधिकारी – शिवसैनिक – युवासैनिक काम करित असून येथील सर्वसामान्यांना या माध्यमातून मदतीचा हात आणि अनेक वर्षाचे प्रश्न मार्गी लागत असल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पदाच्या कारभाराचे सर्व कौतुक होत आहे.
सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असून मे महिन्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागली असल्याने नागरिक त्रस्त आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आदिवासी भागातील नागरिकांची मागणी जोर धरत असताना चिमटेवाडी गावातील ग्रामस्थांची समस्या शिवसेना उध्दव उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत मार्गी लावल्याने सर्व ग्रामस्थांनी त्याचे आभार मानले.