कोलाड खांब परीसरात परतीच्या पावसाने आधीच बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. मोत्यासारख्या धानाची नासाडी केली. त्यात ऐन दिवाळीत पावसाची विश्रांती मिळाल्याने बळीराजा दिवाली पहाट लक्ष्मी पूजन भाऊबीजेचा सण साजरा न करता शेतात उरले सुरलेला धान कापणी झोडणी मळणी करत गोळा करण्याच्या मागे असतानाच कोलाड पाठबंधारे खात्याचा मोठा प्रताप शुक्रवारी रात्री अचानक कोलाड पाठबंधारे खात्याने कुंडलिका सिंचनातून उजवातीर कालव्याला अचानक पाणी सोडल्याने ते खांब परिसरातील खांब, नडवली, शिरवली, मुठवली भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांचे भात कापणी केल्याल्या शेतात गेल्याने खूप मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून अक्षरशः शेतकरी वर्गणी पाठ बंधारे खात्याच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
आधीच बळीराजा या ना त्या कारणाने मेटाकुटीला आला आहे संकटांवर संकट त्याच्यावर ओढावले जातात सरकार कायम घोषणाबाजीत त्याच्या शेतीमाल धानाला पुरेसा भाव मिळताच नाही कधी ईपिक पाहणी तर कधी पीक विमा योजनेचा लाभ मिळेल अशातच सरकारची मोठी घोषणा परतीच्या पावसाने अनेकांची पिके वाया गेली त्याचे पंचनामे वाऱ्यावर असतानाच आपल्या शेतातील उरलेले धान गोळा करण्याचा मार्गावर असतानाच खांब परिसरातील शेतकऱ्यांना त्यांची भात कापणी मळणी कामे युद्ध पातळीवर असताना पाठबंधारे खात्याने अचानकपणे मोठा धक्काच दिला कालव्यात पाणी सोडल्याने ते पाणी परिसरातील शेत जमिनीत गेल्याने पुन्हा मोठया प्रमाणावर धानाचे नुकसान झाले असल्याने ते आता अक्षरशः चिंताग्रस्त होत डोळ्यात अश्रूचेपाठ वाहत असताना दिसत आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने सारे राजकारणी तसेच आमदार खासदार मंत्री महोदय दंग बळीराजा माञ शेतात आपले उरले सुरलेले धान गोळा करण्याच्या मागे मजूर मिळेना त्यामुळे परतीच्या पावसामुळे भात कापणी मळणी लांबणीवर असतानाच कोलाड पाठ बंधारे विभागाने खांब परिसरातील शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता अचानक पाणी सोडल्याने सारे पाणी शेतभर साचल्याने भात कापणी केलेल्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण असा त्यामुळे झालेल्या पीकांचे पाठ बंधारे खात्याने नुकसाभरपाई द्यावी अशी मागणी संबधीत शेतकरी वर्गातून केली जात आहे.
—————————————————
परतीच्या पावसाने मारले पाठीवर पाठबंधारे खाते मारतो पोटावर याला जबाबदार कोण अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे तर परतीच्या पावसामुळे काही पीक वाया गेली उरलेले सुरलेले पीक गोळा करण्याच्या मार्गावर असताना तेथील पाठबंधारे खात्याने अचानकपणे कालव्याला पाणी सोडल्याने अधिक नुकसान झाले त्यामुळे पाठबंधारे खात्याचे धोरण हे शेतकरी विरोधी आणि प्रकल्पांना पाठीशी घालणारे असून झालेला नुकसानीला हे बंधारे खाते जबाबदार असल्याने खांब शिरवली मुठवली नडवली भागातील शेतकऱ्यांना नुकसाभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.
…विनायक पोटफोडे, सामाजिक कार्यकर्ते खांब
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.