अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत पोयनाड हद्दीतील पांडवा देवी येथील हॉटेल पाटील ब्रदर्स चे मालक संदीप दत्तात्रेय पाटील उर्फ सेंडी यांच्या वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी अकस्मिक निधन झाले. निधनाची बातमी कळताच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली.
संदीप यांच्या पार्थिवावर घसवड गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध स्तरातून अध्यात्मिक, उद्योजक, सामाजिक,कला शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रातील मान्यवरांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थ मंडळ घसवड चे अध्यक्ष प्रभाकर पाटील तर सर्वांच्या वतीने प्रज्योत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
संदीप यांचे दहावा सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी नाशिक येथे तर तेरावे गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी राहत्या घरी होणार आहे. अस त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.