पनवेल ( संजय कदम ): आपले पती कामावर गेले असताना पत्नी आपल्या पाच वर्षीय मुलासह कोणास काही एक न सांगता राहत्या घरातून कोठेतरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
ज्योती ज्ञानेश्वर राठोड (वय २७) राहणार सेक्टर-२ ई कळंबोली, असे असून तिची उंची पाच फूट, रंग गोरा, अंगाने सडपातळ, केस वाढलेले काळे, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे असून कानात खड्यांचे दागिने, गळ्यात लहान मंगळसूत्र, तसेच अंगात गुलाबी रंगाचा ड्रेस, पायात लाल रंगाची चप्पल घातलेली आहे. तिला मराठी, हिंदी, बंजारा भाषा अवगत आहे.
तसेच तिच्यासोबत तिचा पाच वर्षीय मुलगा संस्कार हा सुद्धा आहे. त्याची उंची सुमारे तीन फूट, रंग गोरा, अंगाने मध्यम, केस बारीक काळे, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे काळे, कानात बाळी असून अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट तसेच पायात निळ्या रंगाचे बूट घातलेले आहे. तो बंजारा भाषा बोलतो.
या दोघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाणे फोन नंबर ०२२- २७४२३००० किंवा महिला पोलीस नाईक रुपाली पाटील यांच्याशी संपर्क साधावा
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.