पाच दिवसांच्या गौरी गणपतीला भक्तिभावाने निरोप

Kashele Visarjan
कर्जत/कशेळे ( मोतीराम पादीर ) :
 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषात आपल्या लाडक्या गणरायाचे ०७ सप्टेंबर भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाचे आगमन झाले. घराघरात मंगलमय वातावरणामध्ये गणरायाच्या आगमनाने सर्वत्र नवचैतन्य पसरले होते. अशातच गणरायाच्या पाठोपाठ येणाऱ्या गौराईमातेच्या आगमनाची महिला वर्गाला उत्सुकता लागलेली असते.
कर्जत तालुक्यातील शहरात तसेच खेड्यापाड्यात गणराय तसेच दिड दिवसासाठी गौराईमातेचे आगमन होऊन पाच दिवसाचे गणराय गौराईमातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोष करत निरोप देण्यासाठी गावातील तरुण लहान जेष्ठ मंडळी सर्वांनी सहभाग दाखवला होता.
 काही दिवसा पासून पडत असलेल्या पावसाने दांडी मारलेल्या पावसामुळे गणेश भक्तांनी आनंद उत्साहाने मिरवणूक काढून पाच दिवसाच्या गणरायाला विसर्जन करण्यात आले. यावेळी आभाळ दाटले होते पाऊसाने दांडी मारल्याने गणेश भक्तत आनंदाचे वातावरण पसरले होते.
यावेळी गणेश भक्तांचा उत्साह दिसत होता. मोठ्या भक्तीमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले व गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून मोठ्या भक्ती भावाने गणरायाची आरती करून निरोप देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading