कश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटनात गेलेल्या ३० भारतीय निष्पाप नागरीकांचे अमानुषपणे हत्याकांड करण्यात आले. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटत असताना पोलादपूर शहरात देखील या हिंसाचाराचा तेवढे निषेध करण्यात आला.
झालेल्या पहेलगाम येथील पर्यटक हत्याकांडामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश या घटनेमध्ये नाव, जात, धर्म विचारून पर्यटकांची हत्या करण्यात आली. यामुळे देशभरात तीव्र संतापाच्या भावना व्यक्त होत असताना पोलादपूर शहर देखील याला अपवाद राहिले नाही.
पोलादपूर नगराध्यक्ष शिल्पा दरेकर, नगरसेविका अस्मिता पवार, स्नेहा मेहता, माझी उपनगराध्यक्ष नागेश पवार, स्वीकृत नगरसेविका मृगया शहा, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी गटनेते नगरसेवक दिलीप भागवत, स्वप्निल भुवड, अमर नगरकर, भाजपचे नामदेव मोरे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, दीपक उतेकर, माजी नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, संजय कळंबे तसेच असंख्य तरुण पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर निदर्शने करून पोलादपूर तहसील कार्यालयापर्यंत निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढून पहलगाम हत्याकांडाचा निषेध केला.
पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांना या निषेध मोर्चानंतर निवेदन देऊन पोलादपूरकरांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी तहसीलदार घोरपडे यांनी मोर्चेकऱ्यांच्या भावना केंद्र सरकार परत पोहोचवण्याची ग्वाही दिल्यानंतर निषेध मोर्चाचा समारोप झाला.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.