पहलगाम येथे भ्याड अतिरेकी हल्ला – माणगांवकरांनी कॅण्डल मार्च काढून वाहिली श्रध्दांजली!

Mangav candel march

माणगांव (रविंद्र कुवेसकर) : 
मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीर मधील पहेलगाम येथे भरदिवसा निर्भयपणे पर्यटन स्थळी आनंदाने फिरायला गेलेले निशस्त्र, निष्पाप नागरिक लहान मुल, महिला, पुरुषांवर बेछूटपणे अंदाधुंद अत्याधुनिक ए.के. फोर्टी शस्त्रांचा वापर करीत भ्याड हल्ला करण्यात आला, याचा जाहीर निषेध व तीव्र भावना व्यक्त करीत अनपेक्षित अचानक झालेल्या हल्ल्यात स्वतःचे प्राणास मुकलेल्या आपले हिंदूस्थानी नागरिकांचेप्रती भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
माणगांव श्री रामनवमी उत्सव समिती अध्यक्ष शेखर गोडबोले आणि सहकाऱ्यांच्या वतिने समस्त माणगाववासियांचे सहभागातून सायंकाळचे सुमारास महामार्गावरील कमल फर्निचर मार्ट येथून कचेरी रोड मार्गे उतेखोल प्रांत कार्यालय येथील वीर यशंवतराव घाडगे स्मारकापर्यंत हाती मेणबत्त्या घेऊन कॅण्डल मार्च काढून भ्याड अतिरेकी अमानविय हल्ला करणाऱ्या निच अतिरेक्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. 
हा हल्ला करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या अतिरेकी क्रूरकर्म्यांस केंद्र शासनाने कठोर शासन करावे अशा मागणीचे निवेदन गुरुवार दि.२४ एप्रिल रोजी माणगांव प्रांताधिकारी यांस श्री रामनवमी उत्सव समिती व समस्त माणगावकरांच्या वतिने देणार आहेत. याप्रसंगी माणगांवच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी अतिरेक्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्र व इतर राज्यातील नागरिकांस शासनाने लवकर सुखरूप घरी पोहचविण्यास मदतकार्य करावे अशी मागणी केली आहे.
हा कॅण्डल मार्च अत्यंत शांततेत भावपूर्ण वातावरणात निघाला. माणगांव नगरीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार तसेच नगरपंचायत पाणी पुरवठा सभापती कपिल गायकवाड, नगरसेवक राजेश मेहता, नगर सेवक अजित तार्लेकर अनेक प्रतिष्ठीत नागरीक व माणगांव बाजारपेठेतील व्यापारी वर्ग व श्री रामनवमी उत्सव समितीचे सर्व सदस्य युवावर्ग व विशेष माणगांवकर महिलावर्ग मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading