मंगळवारी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मु काश्मीर मधील पहलगाम येथे भरदिवसा निर्भयपणे पर्यटन स्थळी आनंदाने फिरायला गेलेल्या निष्पाप नागरिक, लहान मुले, महिला पुरुषांवर बेछूटपणे अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्लाचा जाहीर निषेध करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
भारताचा अविभाजक घटक असणाऱ्या काश्मीरमध्ये महाराष्ट्रसह इतर राज्यातील असंख्य पर्यटक सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी सहलीसाठी गेले होते. यावेळी दि.२२ एप्रिल रोजी पाकिस्तान येथील दहशतवाद्यानी पहलगाम येथे पर्यटकांवर त्यांची नावे विचारून अंधधुंद बेचूटपणे गोळी बार केला. या गोळीबारात २७ पर्यटकांचा नाहक जिव गेला याचा निषेध म्हणून कोलाड नाक्यावर सकल हिंदू समाज, सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते,एकत्रित आले होते. तसेच याचा निषेध म्हणून यानिमित्ताने शुक्रवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या दरम्यान कोलाड बाजारपेठत बंद पाळण्यात आले होते.
गेलेल्या पर्यटकांवर हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दयावी अशी मागणी कोलाड वाशियांकडून करण्यात आली तसेच मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी सकल हिंदू समाज तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते, सपोनि नितीन मोहिते त्यांची टीम तसेच महेशस्वामी जंगम, नारायण धनवी, चंद्रकांत लोखंडे, विजय शिंदे,एकनाथ बागुल,भरत सातांबेकर,कुमार लोखंडे,संदेश लोखंडे, डॉ.विनोद गांधी,जितु मेहता,महेंद्र वाचकवडे, गणेश वाचकवडे, शैलेश सानप,अमोल बाईत,प्रमोद लोखंडे,कुशवहा,सतिश देशमुख,भावेश जैन, निलेश गांधी, मान्सून अधिकारी, राजा जाधव,अजित दहिंबेकर,सदानंद साळूंखे,सौ.शिंदे कोलाड पंचक्रोशीतील ग्रामस्थ, असंख्य व्यापारी वर्ग,रिक्षा,एपे रिक्षा,मिनिडोअर, चालक मालक तसेच संघटनेचे असंख्ये पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.