पहलगाम भ्याड हल्लाचा नागोठण्यात तीव्र निषेध

पहलगाम भ्याड हल्लाचा नागोठण्यात तीव्र निषेध
नागोठणे (महेंद्र माने) :
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा माजी रायगड उपजिल्हाध्यक्ष किशोर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार 26 एप्रिल रोजी पहलगाम (जम्मू काश्मीर) येथे अतिरेक्यांनी धर्म विचारून हिंदूवर भ्याड हल्ला करीत अनेक हिंदू बांधवांवर बेसुमार गोळीबार करून हत्या केल्याचा शहरासह विभागातील जनतेकडून तीव्र निषेध करण्यात आला. 
यावेळी छ.शिवाजीमहाराज चौकात भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंद, अशा विविध प्रकारच्या घोषणा देत आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व हिंदू बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी किशोर म्हात्रे,दिनेश परमार व गणेश घाग यांनी आपल्या मार्गदर्शनात भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. हल्लेखोर दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी शहर व विभागातील जनतेच्या वतीने सहा.पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपसरपंच अकलाक पानसरे, मा. सरपंच विलास चौलकर,मंदार परांजपे, प्रकाश जैन, अनिल काळे, डॉ.ए.जी. हाफिज,सुधाकर जवके,धनराज उमाळे,विवेक रावकर, सुरेश पोडवाल,रोहिदास हातनोलकर,चेतन ठक्कर, पंकज जैन, प्रफुल जैन, निलेश दोषी यांच्यासह शहर व विभागातील नागरीक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading