माथेरानमध्ये आगामी सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास माथेरान कर सज्ज झाले असून एप्रिल आणि मे महिन्यात याठिकाणी पर्यटकांची मोठया प्रमाणावर गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर हॉटेल धारक आणि लॉज व्यावसायिक त्याचबरोबर छोटे मोठे स्टोल्स दुकानदार सुध्दा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले दिसत आहेत.
पर्यटकांच्या फसवणूक बाबतीत मागील महिन्यात माथेरान बंद करण्यात आले होते ते त्याचवेळी दुसऱ्या दिवशी पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे माथेरान बंद आहे अशा अफवा पसरवल्या जात आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहे.
मुंबई पुण्यापासून अगदी जवळ असणारे सर्वसामान्य पर्यटकांना सुध्दा परवडणारे सर्वांच्या आवडीचे हे सुंदर पर्यटनस्थळ पर्यटकांची आतुरतेने वाट पहात आहे. इथला निसर्ग सर्वांना खुणावत असून येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी इथे आवर्जून हजेरी लावण्यासाठी आणि पर्यटकांच्या सेवेसाठी सर्वच व्यावसायिक सज्ज दिसत आहेत.
नेरळ माथेरान मिनिट्रेनच्या नियमितपणे दोन फेऱ्या होत आहेत. त्याचबरोबर मोटार वाहनाने आल्यास दस्तुरी नाक्यावरून शहरात येण्यासाठी ई रिक्षा, घोडे अमन लॉज रेल्वे स्टेशन पासून आपल्या बालगोपाळांची आवडती मिनिट्रेनची शटल सेवा उपलब्ध आहे. हॉटेल्स आणि लोजिंगचे आरक्षण सुरू असून आपल्या पसंतीच्या हॉटेल्स लोजिंग मध्ये राहण्याची उत्तम सुविधा उपलब्ध आहे.
दिवाळी ,नाताळ नंतरचा एप्रिल आणि मे महिन्याच्या ह्या सुट्ट्यांच्या हंगामात इथल्या निसर्गाशी एकरूप होण्यासाठी इथले प्रदूषण मुक्त शांत,शीतल वातावरण वनराईने व्यापलेला अदभूत निसर्ग पाहण्यासाठी माथेरान सर्वच पर्यटकांना साद घालत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.