पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरान सज्ज !

Matheran
माथेरान ( मुकुंद रांजणे ) :  
शाळांना सुटट्या पडायला लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटक सहकुटूंब पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठी रायगड जिल्ह्यातील सर्वात आवडते ठिकाण म्हणजे माथेरान होय आहे. हिवाळ्यात नाताळच्या सुट्टीमध्ये येणार्‍या पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरान सज्ज झालेले दिसत आहे.
विशेष म्हणजे नेहमीच येथील दस्तुरी नाक्यावर वाहनांची पार्किंगची उद्भवत होती ती समस्या वनसमितीच्या माध्यमातून मार्गी लागत असल्यामुळे पर्यटकांचा वाहन पार्किंगचा प्रश्न सुटण्यासाठी वनसमिती कडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याकामी वन समितीचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी स्वतः जातीने लक्ष वेधले आहे. त्यामुळे घाटरस्त्यात वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार असून सर्व प्रवाशांचा प्रवासदेखील सुकर होणार आहे.
माथेरान शहरात सध्या थंडीचा पारा सकाळी १८ अंशांवर असतो. सकाळी थंड तर दुपारी काही प्रमाणात गरम अशा दोन्ही प्रकारच्या वातावरणात मनसोक्तपणे एन्जॉय करण्यासाठी पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी नाताळ पासूनच आपली सुट्टी माथेरानमध्ये एन्जॉय करणार असल्याचे चित्र हॉटेल आणि  लॉज आरक्षणावरून हॉटेल व्यवस्थापक अंदाज देत आहेत.
——————————————————
माथेरानमध्ये येणार्‍या प्रत्येक पर्यटकांना हे येणारे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन संस्मरणीय कसे राहील यासाठी तयारी प्रत्येक व्यवसाईकाने केलेली आहे. सगळीकडे विद्युत रोषणाई तसेच पर्यटकांना आकर्षित करतील अशा अनेक ऑफर्स हाॅटेल व्यवसायिकांनी ठेवल्या आहेत. प्रदुषण मुक्त शहरातून नवीन वर्षाची सुरुवात नक्कीच अनेकांना उर्जा आणि प्रेरणा देऊन जाईल.
…भास्करराव शिंदे, उद्योजक माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading