आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सतत झटणारे परशुराम दरवडा यांना आदर्श आदिवासी समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
दरम्यान, कर्जत तालुका आदिवासी बहूल भाग असून आदिवासी समाजाची उन्नती व्हावी या साठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत त्यामध्ये कर्जत आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा हे आदिवासी समाजाच्या उन्नती साठी प्रयत्नशील असून,सतत आदिवासी समाजासाठी झटत आहेत.
एक कार्यतत्पर कार्यकर्ता, समाजाचे आधारस्तंभ, समाजसेवक, म्हणून आदिवासी समाजा मध्ये त्याची ओळख असून त्यांच्या कार्याचा नेतृत्व मानले जात आहे. आदिवासी समाजात सामाजिक कार्यक्षेत्रात त्यांचे नाव लौकिक आहे. बेडीसगाव पो.शेलू या ठिकाणी आदिवासी समाजाची सभा झाली. त्या सभे मध्ये २५०० आदिवासी लोकसंख्या असलेले बेडीसगाव समस्त आदिवासी बांधव यांच्या वतीने परशुराम दरवडा यांना आदर्श आदिवासी समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
या वेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज उपस्थित होता.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.