परदेशात 5 हजार युवक-युवतींना रोजगाराची संधी

Jobs1
अलिबाग :
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना इस्त्रायल येथे घरगुती सहाय्य्क (Home Based Caregiver) या क्षेत्रात पहिल्या टप्प्यात सुमारे 5000 युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अ.मु.पवार यांनी दिली आहे.
याकरिता पात्रता निकष पुढीलप्रमाणे :- काळजी वाहू (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यता प्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे,  (including OJT), भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, डीए, एएनएम, जीएनएम, बीएससीनर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
 इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणे आवश्यक,   वय वर्षे 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत,  रू.1 लाख 31 हजार पर्यंत मासिक वेतनाची संधी,  इस्त्राईल येथे नोकरी मिळविण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत,  मेडिकल विमा,राहण्याची आणि जेवणाची सोय,  इस्त्राईल येथील सुरूवातीच्या काळात आवश्यक मदत.
अधिक माहिती व नोंदणीसाठी www.maharashtrainternational.com/jobDetail.aspx या अधिकृत संकेतस्थळाला भेट देवून अप्लाय करावे.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading