पनवेल ‘RTO’ ची वाहनांसाठी नवी मालिका होणार सुरू !

Rto Panvel

पनवेल :

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे “VAHAN 4.0” या संगणक प्रणालीवर परिवहन संवर्गातील मालवाहू वाहनांसाठी (Transport Vehicle) सध्या सुरू असेलेली MIH-46-CL मालिका संपल्यानंतर तात्काळ नविन मालिका MII-46-CU सुरू करण्यात येणार आहे.  अटींच्या अधिन राहून आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकासाठी अर्ज (विहीत शुल्काच्या धनाकर्यासह D.D.) दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत स्विकारून पसंतीचे व आकर्षक क्रमांक विहीत शुल्क आकारून आरक्षित करण्यात येतील.
एका पसंतीच्या / आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्यांचेकडून दि.२५ सप्टेंबर रोजी अतिरिक्त रकमेचे धनाकर्ष (D.D.) दुपारी १ वाजेपर्यंत सीलबंद लिफाप्यात स्विकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सदर सीलबंद लिफापे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात उपस्थित अर्जदारांसमक्ष उघडण्यात येतील. विहीत नियमांनुसार पसंतीचे / आकर्षक क्रमांक आरक्षित करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading