पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या 2 तासात हरविलेल्या लहान मुलाचा काढला शोध

पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या 2 तासात हरविलेल्या लहान मुलाचा काढला शोध
पनवेल ( संजय कदम ) :
पनवेल शहरातील जव्हेरी बाजारपेठ परिसरातून हरविलेल्या 4 वर्षीय मुलाला अवघ्या 2 तासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधून काढून त्याला त्याच्या आईच्या हातात सुपूर्द केल्यावर आईच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
हितांश मेहेरे असे या मुलाचे नाव असून तो पनवेल शहरातील जव्हेरी बाजारपेठ असताना आईला काही न सांगता तो तेथून निघून गेला. थोड्या वेळात आईला आपला मुलगा त्या ठिकाणी नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे तीचा जीव हवालदिल झाला. स्थानिकांच्या मदतीने तीने त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने अखेरीस त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली व याबाबतची माहिती वपोनि नितीन ठाकरे तसेच पो.नि.प्रवीण भगत यांना दिली. तातडीने या अधिकार्‍यांनी पोलीस हवालदार जयराम बांगर, पो.हवा. विलास सातमकर, पो.शि.हनुमंत गभाले, पो.शि.जीवन धोत्रे, पो.ना.सुभाष राठोड यांना सदर मुलाचा शोध घेण्यासाठी चारही दिशांना पाठविले.
यावेळी ज्या ठिकाणी मुलगा उभा होता त्या ठिकाणापासूनचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी पाहण्यास सुरूवात केली. यावेळी त्या कॅमेर्‍यामध्ये तो मुलगा आढळून आला. पुढे अधिक शोध घेत असताना सदर मुलगा हा आदिल टॉवर परिसरात उभा असल्याचे दिसून आल्याने या पथकाने तातडीने येथे जावून त्या मुलाला ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणून त्याच्या आईकडे सुपूर्द केली. यावेळी आईने पोलिसांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading