पनवेल परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
त्यामध्ये पनवेल जवळील चिंचवण गावाच्या हद्दीत अंग्रेजी ढाब्यासमोर पादचारी इसम सद्दाम हुसेन हुल्लौर (35) याला कोणत्यातरी अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्यात तो गंभीररित्या जखमी होवून मयत झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पेालीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मुंब्रा-तळोजा मार्गावर नावडे गाव येथे झालेल्या अपघातात अज्ञात कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सुलतान अब्दुल रऊस हसवारे (21) या तरुणाचा मृत्यू झाला.
पनवेल येथे राहणारा सुलतान हा मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास तळोजा येथून दुचाकीवरून पनवेल येथे जात असताना, अज्ञात कारने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. तर तळोजा एमआयडीसीत घडलेल्या अपघातात डोंबिवलीतील पलावा सिटीत राहणारे शशी नायर (66) यांचा मृत्यू झाला. शशी नायर त्यांच्या दुचाकीने तळोजा एमआयडीसीत आले होते. ते आयजीपीएल कंपनीकडून बेल नाक्याच्या दिशेने जात असताना अज्ञात डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या आपघातात नायर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या दोन्ही अपघातांप्रकरणी तळोजा पोलिसांनी फरार कारचालक व डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.