पनवेल :
पनवेलच्या पत्रकारांचा दिल्ली अभ्यास दौरा सुरु असताना लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांची भेट घेण्यात आली. या भेटीत मंत्री महोदयांनी आपल्या विभागाचे कामकाज आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. या भेटीसाठी विभागाचे सल्लागार संदीप पोखरकर यांची मोलाची मदत झाली.
मंत्री महोदयांच्या व्यस्त वेळापत्रकात असूनही त्यांनी पत्रकारांना १५ मिनिटांची वेळ दिली, ही बाब सर्वांसाठी विशेष ठरली. यावेळी मंत्री सीताराम मांझी यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी होती. तरीही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांवर चर्चा केली.
पत्रकारांनी या योजनांना अधिक प्रसिद्धी देण्याचे आवाहन मंत्री मांझी यांनी केले, जेणेकरून या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील. या वेळी उपस्थित पत्रकारांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.
या चर्चेसाठी उपस्थित पत्रकारांमध्ये अनिल कुरघोडे, लालचंद यादव, गौरव जहागीरदार, शैलेश चव्हाण, सुनील पाटील, संतोष भगत, संतोष सुतार, सुनील वारगडा, रवींद्र गायकवाड, अण्णासाहेब अहिर, मयुर तांबडे व मनोहर पाटील यांचा समावेश होता.