परिमंडळ 2 अंतर्गत पनवेल तालुका पोलीस ठाण्याने 100 दिवसांची क्षेत्रिय कार्यालयीन सुधारणा मोहीम अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी पनवेल तालुका पोलिसांना द्वितीय क्रमांकाचे गुणांकन दिले आहे.
या मोहिमेत वपोनि गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी आणि कर्मचार्यांनी अनुशासन, नागरिकांशी संवाद, गुन्हेगारी नियंत्रण, वॉर्डस्तर सुधारणा, तक्रार निवारण आणि कार्यालयीन कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणले. त्यांच्या या संयुक्त प्रयत्नांना मिळालेल्या गौरवामुळे पोलीस दलात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
या यशामुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्यात विशेष जल्लोष साजरा करण्यात आला. अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या सामूहिक प्रयत्नाचा गौरव म्हणून समाधान व्यक्त केले. वपोनि गजानन घाडगे आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, या मोहिमेत प्रथम क्रमांकाचे गुणांकन परिमंडळ 1 अंतर्गत येणाऱ्या एपीएमसी मार्केट पोलीस ठाण्याला मिळाले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.