पनवेलमध्ये हृदयद्रावक घटना: आईने 8 वर्षाच्या मुलीला 29व्या मजल्यावरून फेकून केली हत्या, नंतर आत्महत्या

Nexon Marathon Panvel
पनवेल :
काही कुटुंबीय लक्झरी लाइफस्टाइलचा दिखावा करण्यासाठी हायफाय सोसायट्यांमध्ये राहायला जातात. मात्र केवळ दिखाव्याची श्रीमंती असलेल्या या कुटुंबात कौटुंबिक सुख मात्र हरवलेले दिसून येते. याचीच प्रचिती देणारी एक घटना पनवेल नजीकच्या पळस्पे फाटा परिसरात घडली आहे.
पळस्पे फाटा परिसरात असलेल्या नेक्सॉन मॅरेथॉनमधील औरा या भव्य टॉवरमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. या बिल्डिंगमध्ये २९ व्या मजल्यावर राहणाऱ्या दुवा कुटुंबियांसोबत ही भयानक घटना घडली आणि क्षणार्धात संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झाले. आशिष दुवा हे आपली पत्नी मैथीली दुवा( वय-३७ वर्ष) आणि मुलगी मायरा दुवा यांच्यासोबत राहत होते. मात्र अचानक ८ वर्षांची मुलगी मायरा २९ व्या मजल्यावरून खाली पडली आणि तात्काळ गतप्राण झाली. या प्रसंगी नखशिकांत हादरलेल्या आशिष दुवा यांनी आपल्या मुलीला पाहण्यासाठी लागलीच खाली धाव घेतली आणि क्षणार्धातच त्यांची पत्नी देखील वरून खाली पडली आणि त्यांच्या डोळ्यादेखतच मृत्युमुखी पडली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
या घटनेनंतर आशिष दुवा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांची पत्नी मैथिली हिची मानसीक अवस्था ठिक नव्हती. त्यातूनच अज्ञात कारणास्तव तिने ८ वर्षांच्या निष्पाप मायराला २९ व्या मजल्यावरून घराच्या बेडरूमच्या खिडकीतुन खाली फेकून देत तिचा जीव घेतला आणि स्वतः देखिल खाली उडी मारून आपले जीवन संपवले.
या घटनेनेनंतर अनेक चर्चा या परिसरात ऐकावयास मिळत आहेत. या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या अनेकांनी या घटनेबाबत वेगवेगळे मत व्यक्त केले आहेत. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दूवा पती- पत्नीमध्ये सातत्याने वाद आणि भांडणे होत होती. त्याच रागातून पत्नीने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या गूढ घटनेबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading