पनवेलमध्ये मोठी पोलिस कारवाई! कोंबींग ऑपरेशनमध्ये गुन्हेगारांना चाप

Panvel police combing opration
पनवेल (संजय कदम ) :
पनवेल शहर पोलीस ठाण्यामार्फत जय भारत नगर, खाडी किनारी झोपडपट्टी, पुष्पकनगर, पनवेल रेल्वे स्टेशन आणि एस.टी. स्टॅन्ड परिसरात कोंबींग ऑपरेशन आणि All Out मोहीम राबवण्यात आली. ही धडक कारवाई पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 2) प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पुढीलप्रमाणे गंभीर गुन्हे उघडकीस आले:
  • अमली पदार्थ सेवन करणाऱ्या 3 व्यक्तींवर कारवाई
  • देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या 3 जणांविरोधात गुन्हे दाखल
  • गर्दी व मारामारीच्या गुन्ह्यातील 1 संशयित आरोपी ताब्यात
  • कलम 110 म.पो.का. अंतर्गत 1 गुन्हा दाखल
  • हिस्ट्रीशीटर आणि चीटर 2 जणांना अटक
  • नाकाबंदी दरम्यान 182 वाहने तपासणी, त्यापैकी 39 वाहनांवर कारवाई
  • 3 संशयित बांग्लादेशी व्यक्ती चौकशीसाठी ताब्यात
या कडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading