पनवेलमध्ये मोटारसायकल चोरीच्या दोन घटना; होंडा शाईन आणि बुलेटवर चोरांचा हात

दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात
पनवेल :
पनवेल परिसरात गेल्या 24 तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या असून या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिली घटना पनवेल शहरातील एसटी बस स्थानकाजवळ घडली. भारत राठोड हे कोकण हॉटेलजवळ आपली होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एमएच-21-बीएक्स-6818) पार्क करून जेवणासाठी गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी सदर 60 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल लंपास केली.
दुसरी घटना पळस्पे फाटा येथे घडली. उमेश गायकर यांनी त्यांची बुलेट मोटारसायकल जेएनपीटी ते पळस्पे जाणाऱ्या उड्डाण पुलाखाली उभी केली होती. काही वेळातच अज्ञात चोरट्यांनी तीही चोरून नेली. या दोन्ही घटनांबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांत अस्वस्थता असून, पोलिसांनी गस्त वाढवावी आणि चोरट्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading