पनवेल शहरातील व्हि.के.हायस्कूल रोडवरील जरीमरी देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून मंदिरातील दान पेटीतील रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी तत्परतेने तपास करून एका आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मंदिराचा मुख्य दरवाजा कोणत्यातरी साधनाच्या सहाय्याने उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी रॉडच्या साहाय्याने दान पेटी फोडून त्यामधील सुमारे 3 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा संपूर्ण प्रकार मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
या घटनेची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आकाश चरण (वय 32, रा. पनवेल) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.