दि. २४ ऑक्टोबर रोजी माथेरानमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सुधाकर घारे यांच्या पाठींब्यासाठी पत्रकार परिषद घेत, कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांविरोधात आपले राजीनामे जाहीर केले होते.
मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री येथे पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन हे राजीनामे नामंजूर केले. त्यांनी सर्वांना आगामी निवडणुकांमध्ये पक्षासाठी काम करण्याचे निर्देश दिले. या वेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी प्रसाद सावंत यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले.
——————————————–
कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारी निवडी बदल जो काही संभ्रम असल्याने, माथेरान मधील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा पदाधिकारी व शिवसैनिक यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने, आम्हाला पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांनी मातोश्रीवर बोलावून साहेब, व सेनेचे दिग्गज नेते यांनी आमचा सभ्रम दूर करत तुम्ही निष्ठावंत आहात तुम्ही निवडणुकीमध्ये कामाला लागा असे सांगितले आहे.
…प्रसाद सावंत, माजी नगरसेवक, माथेरान गिरिस्थान नगरपरिषद,
——————————————–
आमच्या राजीनाम्याची दखल घेत अम्हाला पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांनी मातोश्रीवर बोलवले व भरपूर वेळ देत आमच्याशी चर्चा करून, शिवसेनेनी निष्ठावंत उमेदवार दिला आहे. तुम्ही ही माथेरानचे सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहात, माथेरान या आधी ही तुम्ही संभाळला आहे. व पुढे ही तुम्हाला संभाळायचे आहे. तुम्हाला निष्ठावंत उमेदवाराचे काम करायचे आहे. तुम्ही निवडणूकीच्या कामाला लागा असा साहेबांचा असलेला आदेश आम्ही शिरमात्र समजून आम्ही आज पक्षाचे काम करायला तयार आहोत.
….. कुलदीप जाधव, माथेरान शहर प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना,
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.