पत्नीच्या विवाहबाह्य संबंधातून रेल्वे पोलीसाचा खून, चौघे जेरबंद

रेल्वे पोलिसाची आत्महत्या नव्हे, दोन आज्ञताकडून केलेला मर्डर
रायगड (अमुलकुमार जैन) : 
 पनवेल रेल्वे पोलिस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असणारे विजय चव्हाण यांची हत्या ही त्याची पत्नी पूजा चव्हाण हिच्या विवाहबाह्य संबंधातून झाला असून याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी मयत विजय चव्हाण ह्याची पत्नी पूजा चव्हाण(३५), मामे भाऊ प्रकाश उर्फ धीरज चव्हाण (२३) यांच्यासहित विजय चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण हिचा प्रियकर भूषण निंबा ब्राह्मणे (२९) आणि प्रविण पान-पाटील (२१) यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवीन वर्षाच्या पहिल्याच रात्री म्हणजे बुधवारी (दि.1) पहाटे 5.25 ते 5.32 च्या सुमारास दोन अज्ञातांनी विजय चव्हाण यांचां गळा आवळून खून करून त्यांचां मृतदेह हा रबाळे ते घणसोली दरम्यान ढकलून अपघात असावा असे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र समोरून येणाऱ्या लोकल ट्रेनच्या मोटरमनने वाशी रेल्वे पोलिसांना संपर्क करून सांगितले होते. त्यामुळे आरोपींनी केलेले अपघाताचे बनाव उघड झाले असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
वाशी रेल्वे पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना या खुनाचा तांत्रिक तपास करीत असताना मयत विजय चव्हाण यांच्या मोबाईलमधून पेटीएमद्दारे केलेल्या भुर्जी पाव वाल्याला२४ रुपयांच्या पेमेंट हा ऑन लाईन केल्यामुळे या हत्येचे गूढ उकलले.
पूजा हिचे भूषण ब्राम्हणे याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. या प्रेमसंबंधात विजय अडथळा ठरत असल्याने तिने आपल्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. प्रियकर भूषण आणि मामेभाऊ प्रकाशच्या मदतीने हत्येचा मास्टर प्लॅन तयार केला. प्रकाशने विजय यांच्या सोबत ‘थर्टीफर्स्ट’च्या पार्टीचे नियोजन केले. त्यानुसार सायंकाळी विजय आणि प्रकाश यांनी पार्टी केली. त्यानंतर त्यांनी बाजूलाच असलेल्या हातगाडीवर भुर्जी घेऊन ते गाडीत बसले.
यानंतर ठरल्याप्रमाणे गाडीमध्ये आधीपासून हजर असलेल्या प्रियकर भूषण आणि प्रविण याने गळा आवळून हत्या केली. आरोपींनी त्यांचा मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास ट्रान्स-हार्बर मार्गावर पहाटेच्या सुमारास टाकून अपघात असल्याचा बनावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटारमनच्या सतर्कतेने या हत्येचा कट उघड झाला.
चव्हाण यांच्या हत्या प्रकरणाबाबत रेल्वे पोलिसांकडे कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, त्या दिवशी रात्रीच्या सुमारास विजय चव्हाण यांच्या गुगल पेवरुन घणसोलीत २४ रुपयांमध्ये भुर्जीपाव घेतल्याची व्यवहाराची माहिती पोलिसांना मिळाली.
सदर माहितीच्या आधारे भुर्जीपावच्या गाडीचे ठिकाण गाठले. त्यानंतर पोलिसांनी नजीकच्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता, विजय सोबत मामेभाऊ प्रकाश असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी प्रकाशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता. या गुन्हयाची कबुली दिली.
चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण (३५) हिचा प्रियकर भूषण निंबा ब्राह्मणे (२९) याने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर पूजाला मदत करणारा मामेभाऊ प्रकाश उर्फ धीरज चव्हाण (२३) आणि प्रविण पान-पाटील (२१) या चौघांना वाशी रेल्वे पोलिसांनी अटक करून अधिक तपास करीत असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading