रायगड जिल्हातील बडतर्फ पोलिस हवालदार प्रशांत अशोक कांबळे,रविंद्र अंबु राठोड यांच्यासहित चार जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असताना त्यातील दोघांना कामावर रुजू करून घेतले तर या दोघांना परत सेवेत घेण्यास रायगड पोलिस प्रशासनसहित कोकण परिक्षेत्र विभागाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असल्याने संबधित कर्मचारी यांनी येत्या प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्रात विवीध ठिकाणी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन जिल्हा रायगड पोलिस प्रशासनसहित कोकण परिक्षेत्र विभागास दिला आहे. न्यायालयाचे आदेशाकडे पोलिस प्रशासन मोठे झाले का? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,नोट बंदीच्या काळात बडतर्फ पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड आणि प्रशांत कांबळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र, तपासातील त्रुटींमुळे न्यायालयाने डिसेंबर 2023 मध्ये त्यांना निर्दोष ठरवले…मात्र याच खटल्यातील इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ पोलीस सेवेत पुन्हा रुजू करून घेतले गेले होते…निकाल लागूनही राठोड आणि कांबळे यांना ‘लवकरच बोलावण्यात येईल’ या शब्दांवर थांबवले जात आहे. यावर “आम्हाला न्यायालयाने निर्दोष ठरवले,मग आम्हाला सेवेत परत कधी घेणार?” रवींद्र राठोड यांनी संतप्त स्वरात प्रशासनाला विनंती केली आहे…
पोलिस प्रशनानातील वरिष्ठ अधिकारी वर्गाने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी यांनी खोट्या पुराव्यांच्या आधारे आम्हाला यात अडकवले…हे वैयक्तिक आकसातून झाले आहे. आम्ही निर्दोष असताना आम्हाला भूतकाळाच्या छायेत अडकवले जात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवरच अन्याय होत असेल, तर सामान्य लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनतो…आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, तेच जर अन्यायग्रस्त असतील, तर आम्हाला कोण वाचवणार?. खोट्या पुराव्यांच्या खेळीने आमचे आयुष्य उध्वस्त झाले आहे असे रवींद्र राठोड बोलले. दोघांना सेवेत घेतले आहे व आम्हाला नाही त्यामुळे राठोड आणि कांबळे यांच्या कुटुंबीयांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
एका खोट्या आरोपामुळे आम्हाला समाजाकडून वेगळं पाहिले जात आहे व त्यात आर्थिक व मानसिक असा वेगळाच त्रास सहन करावा लागत आहे, तात्काळ सेवा बहाली, खोट्या पुरावे सादर करणाऱ्या दोषींवर कारवाई आणि भरपाईची मागणी बडतर्फ पोलिस कर्मचारी यांच्यासहित त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आली असून या प्रशासनाला जबाबदार धरण्याची वेळ आमच्यावर आली आहे असेही त्या म्हणाल्या.
या प्रकरणाने प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी आणि पक्षपातीपणा उघड केला आहे, असे आरोप बडतर्फ कुटुबियांनी केले आहेत…न्यायालयाचा आदेश असूनही आम्हाला न्याय मिळत नसेल, तर सर्व सामान्य माणसासाठी परिस्थिती किती गंभीर असेल? असे विचार करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. आम्ही प्रचंड तणावांमध्ये आमचे जीवन कसेबसे जगत आहोत…
न्यायासाठी लढणाऱ्या दोन निर्दोष पोलीस कर्मचाऱ्यांच्या संघर्षाने प्रशासकीय व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि पक्षपातीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. रवींद्र अंबू राठोड आणि प्रशांत कांबळे यांना न्यायालयाने निर्दोष ठरवलेले आहे…परंतु पोलीस अधिकारी यांच्यामुळे अद्याप सेवेत पुनःस्थापित झालेले नाहीत…न्यायालयाचा आदेश असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष कसा केला…हा प्रश्न उपस्थित होत आहे.जर पोलिसांवरच अन्याय होत असेल, तर सामान्य जनतेचे काय?यांसारखे प्रश्न उपस्थित केले जात आहेत… याबाबत अधिक माहिती देताना राठोड यांनी सांगितले की, अर्जामध्ये न्यायालयाचे सर्व कॉफी तसेच पोलिस खात्यातिल (विभागय चौकशी अधिकारी) डी कॉफी यांनी आमचे विरूध्द कोणत्याही प्रभोर अपिल अथवा पो.कर्मचारी गुन्हेगार आहेत आसे मा.शेसन कोर्ट, हायकोर्ट,सुप्रिम कोर्ट किंवा इतर वरिष्ठ अधिकारी यांना हे गुन्हेगार नसुन केस पुन्हा ओपन करणेबाबत अधिकाऱ्यांना कागदोपत्री व्यवहार केलेले नसून शेसन कोर्ट अलिबाग यांनी आमहाला शेसन कोर्ट केस नं.३६/२०१६, शेसन कोर्ट नं.२/२०१७ गुन्हांतुन निदोष मुक्तता आमची केली आहे.
याबाबत रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे पोलिस महानिरिक्षक कोकण परिक्षेत्र नवि मुंबई याबाबत लेखी पत्राव्दारे कळविण्यात आलेले असून आम्हांला तसेच आमच्या परिवारास मानसिक शारिरीक त्रास देत आहोत असे समजुन दि. २६/०१/२०२५ पूर्वी आम्हांला आंम्ही दिलेल्या अर्जाचा विचार करत नसाल तर आंम्ही भारताचा झेंडा (तिरंगा) अंगावर घेवून रायगड जिल्हयात कोणत्याही पोलीस ठाणे हद्दीत व कोणत्याही शासकीय कार्यालयासमोर,कोणत्याही रायगड जिल्हयातिल पालकमंत्री यांच्या सहित जिल्ह्यातील आमदार, खासदार यांचे बंगल्यासमोर आत्मदहन करणार असून त्यास जबाबदार पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र कोकण भवन नवी मुंबई हे आत्मदहन करण्यास मजबूर करीत आहेत. असे समजून आमचे जिवितास बरे वाईट झाले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच आंम्ही गुन्हातुन निर्दोष मुक्तता होवुन,अर्जा देवून तसेच तथा घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधनाचा विचार करत नसून आपण स्वताःच्या अधिकाराचा व सरकारी पदाचा गैरवापर करून आमचा विचार करत नसल्यामुळे आम्ही शेवटचा घेतला आहे.
————————————————
बडतर्फ पोलिस हवालदार प्रशांत अशोक कांबळे,रविंद्र अंबु राठोड यांच्या आत्मदहन इशाराबबत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की हा आमचा अंतर्गत विषय आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.