
माथेरान (मुकुंद रांजाणे) :
पर्यटकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी मावळ मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने, दिल्लीत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे लवकरच पर्यटकांसाठी या मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या निर्णयामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.