नेरळ महावितरणच्या भोंगळ कारभार; स्पार्किंग, डीओ उडणे आदि समस्यांमुळे वीज ग्राहक त्रस्त

Mseb Karjat

कर्जत ( गणेश पवार ) : 

नेरळ मधील विद्युत पुरवठा हा स्पार्किंग होणे, डीओ उडणे आशा आदि समस्यांमुळे खंडीत होण्याच्या समस्या या सुरूच असुन, याचा फटका नेरळ मधील विज ग्राहकांना त्यांच्या घरातील महागडे विद्युत उपकरणाचे होणारे नुकसान हे सोसावा लागत आहे. तर दि. २२ सप्टेंबर रोजी रात्रीचे सुमारास राजेंद्रगुरूनगर येथील असलेल्या ट्रान्सफॉर्मवर मोठया प्रमाणात स्पार्किंग झाल्याने बत्तीगुल झाली होती. 
या आधी ही याच ट्रान्सफॉर्माच्या पेटीला स्पार्किंगमुळे आग पकडल्याची घटना घडली होती. हा सर्व प्रकार पाहाता मात्र नेरळ महावितरण विभागाकडून आशा समस्यांचे कायमस्वरूपी निवारण करण्यापेक्षा तात्पुरती स्वरूपाची मलमपट्टी होत असल्याने आशा स्पार्किंगच्या घडना घडत असल्याने, नेरळ महावितरण विभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे का? व अशा जटील समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची नेरळ महावितरणतसदी घेणार का? असे प्रश्न मात्र येथील वीजग्राहकांकडून उपस्थित होत आहे.
नेरळ गाव व परिसरात नेरळ महावितरणाच्या अत्यारीतील पसरलेले विद्युत जाळे यामध्ये समाविष्ठ असलेले विद्युत पोल, विद्युत तारा अंदाजे ५० वर्ष जुन्या झाल्या असल्याने, त्यांची क्षमता निकामी झाल्याचे चित्र असल्याने, तसेच नेरळ विकास प्राधिकण संकुलनाची झालेली स्थापना व त्यामुळे नेरळ विकास प्राधिकण संकुलन क्षेत्रात येणाऱ्या आजुबाजुच्या परिसरात मोठया प्रमाणात उभे होत असलेले गृहप्रकल्प व वाढते नागरिकरण पाहाता मोठया प्रमाणात वाढता विजपुरवठा व या वाढत्या विजपुरवठयासाठी पूर्वी प्रमाणे असलेल्या विज पुरवठ्याच्या क्षमते प्रमाणे कार्यरत असलेले ट्रान्सफॉर्मर न बदलता त्या ठिकाणी जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर न बसवता नेरळ महावितरणा कडून पूर्वी प्रमाणे असलेल्या कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवरून विद्युत पुरवठा दिल्याचे चित्र समोर येत असल्याने, वारंवार विजेचा लोढ वाढत असल्याने मात्र डिओ उडण्याचे व जुने विद्युत पोल व तारा बदलल्या जात नसल्याने स्पार्किंग होऊन विजपुरवठा हा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार सुरू असल्याचे ही बोलले जात आहे.
 दि. २२ सप्टेंबर रोजी रात्रीचे सुमारास राजेंद्रगुरूनगर येथील असलेल्या ट्रान्सफॉर्मवर मोठया प्रमाणात स्पार्किंग झाल्याने बत्तीगुल झाली होती. तर या आधी ही दि. २९ मार्च २०२४ रोजी रात्रीचे सुमारास याच ट्रान्सफॉर्माच्या पेटीला स्पार्किंगमुळे आग पकडल्याची घडलेली घटना. तर कुंभारआळी ते राजेंद्रगुरूनगर मार्गावरील कवाडकर यांचे घरा जवळील विद्युत पोल हा गंजल्याने पडलेला होल व कधी पडून अपघात होऊन जिवितहाणी होण्याची शक्यता असताना, या संदर्भात लेखी तक्रार देऊन सुध्दा महावितरणाचे होणारे दुर्लक्ष, तर काही ठिकाणी ट्रांसफार्मर खालील असलेल्या डीपीच्या पेट्यांची उघडे असलेले दरवाजे असा सर्व प्रकार पाहाता मात्र नेरळ महावितरण विभाग एकादी जिवितहानी होण्याच्या प्रतिक्षेत की जिवितहानी झाल्यानंतर या समस्यांची दखल घेणार व आशा जटील समस्यांचे कायमस्वरूपी निवारण करण्यापेक्षा तात्पुरती स्वरूपाची मलमपट्टीचे प्रकार पाहाता नेरळ महावितरण विभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे का? व अशा जटील समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची नेरळ महावितरणतसदी घेणार का? असे प्रश्न मात्र येथील वीजग्राहकांकडून उपस्थित होत आहे.
——————————————–
राजेंद्रगुरूनगर मधील व सम्राट नगर जवळील असलेल्या ट्रांसफार्मरवरील असलेल्या डीपीच्या पत्र्याच्या पेटीला दि.२९ मार्च २०२४ रोजी रात्रीचे वेळी स्पार्किंगमुळे आग लागून विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तर दि. २२ सप्टेंबर रोजीच्या रात्री ही याच ट्रांसफार्मरवर मोठ्या प्रमाणात स्पार्किंग झाल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. मात्र दि.२९ मार्च २०२४ रोजी रात्रीचे वेळी झालेल्या स्पार्किंग संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्या संदर्भात लेखी तक्रार व प्रत्यक्षात नेरळ महावितरण अधिकारी यांची भेट घेऊन तोंडी केलेल्या सुचना व त्यांचे बघतो करून घेतो असे मिळणारे मोगम उत्तर पाहाता. व दि. २२ सप्टेंबर रोजीच्या रात्रीचे वेळी घडलेला प्रकार पाहाता नेरळ महावितरणा किती कार्यक्षम आहे. हे मात्र स्पष्ट होत आहे.
…संदीप उतेकर, नेरळ शहर उपशाखा प्रमुख, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.
——————————————–
नेरळ मधील काही असलेल्या ट्रांसफार्मर ठीकाणी आलेल्या डीपी करीता बसवण्यात आलेल्या पत्र्यांच्या पेटीचे उघडे दरवाजे पाहाता, अशा ठिकाणी एखादया लहान मुल किंवा मुख्या जनवाराचा शॉक लागून जिव गेल्यानंतर महावितरण विभाग जागा होऊन अशी उघडी दरवाजे बंद करण्याची तसदी घेणार का? असा प्रश्न उपस्थित करत हा नेरळ महावितरणाचा निव्वळ भोगळ कारभार सुरू आहे.
…अशोख त्रिखंडे, सामाजिक कार्यकर्ते, राजेंद्रगुरूनगर नेरळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading