नेरळ -ममदापूर मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था

Karjat Mamadapur Road
कर्जत (गणेश पवार) : 
नेरळ विकास प्राधिकरण अंतर्गत नेरळ, कोल्हारे व ममदापूर ग्रामपंचायतीचा समावेश येत असुन, नेरळ – ममदापूर मुख्य रस्त्याची अक्षरशः खड्डेमयस्थिती तसेच धुळदाण झाली आहे. या रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या चारचाकी वाहनचालकांना खड्डयांचा तर दुचाकी व पायपीट करणाऱ्या नागरिकांन खड्डयांसह धुळीचा मोठया प्रमाणात त्रास सह करावा लागत आहे. तसेच मोठया प्रमाणांत उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असल्याने, व नेरळ – ममदापूर मुख्य रस्ता तसेच दिलकॅप कॉलेज व अंतर्गत रस्त्यांची ही दुरावस्था झाली असल्याने, प्राधिकरणाकडून लवकरात लवकर या रस्त्यांची कांमे करण्यात यावी. अन्यथा ग्रामस्थांकडून आंदोलन केले जाईल असा इशारा ममदापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पुंडलीक शिनारे यांनी इशारा दिला आहे.
नेरळ विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या नेरळ, कोल्हारे व ममदापूर या ग्रामपंचायतींचा समावेश येत असुन, सध्या नेरळ व कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील गृहप्रकल्पापेक्षा मोठया प्रमाणात ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत मोठया प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरु आहेत. तर या सुरू असलेल्या गृहप्रकल्पांच्या कामांच्या परवानगी पोटी बांधकाम व्यावसायीकांकडून मोठया प्रमाणात कर स्वरूपात प्राधिकरणात लाखोंचा निधी जमा होत असताना, मात्र प्राधिकरणाच्या माध्यमातून दिलकॅप कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्याचे साधारण सन. २००७ मध्ये डांबरी करणाचे काम करण्यात आले होते परंतू ह्या रस्त्याची अक्षरशः खड्डेमयस्थिती झाली आहे. 
उर्वरीत गॉर्डन प्लॉट ते दिलकॅप कॉलेज रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच नेरळ – ममदापूर मुख्य रस्त्याचे साधारण ५० मिटरचे सिमेंट काँक्रिटचे काम हे साधारण दोन वर्षापूर्वी प्राधिकरणाचे माध्यमातून करण्यात आले आहे. मात्र या रस्त्याचे तुलशी ऑफीस ते ममदापूर गाव असे साधारण २५० मिटरचे काम हे प्राधिकरणाकडून करण्यात आले नसल्याने, नेरळ – ममदापूर या मुख्य रस्त्याची अक्षरशः खड्डेमयस्थिती तसेच धुळदाण झाली आहे. 
या रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या चारचाकी वाहनचालकांना खड्डयांचा तर दुचाकी व पायपीट करणाऱ्या नागरिकांन खड्डयांसह धुळीचा मोठया प्रमाणात त्रास सह करावा लागत आहे. तसेच मोठया प्रमाणांत उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असल्याने, वाहनचालक व नागरिकांना प्रवासादरम्यान खड्डयांचा व धुळीचा होणारा त्रास दूर करण्यासाठी प्राधिकरणा मार्फत या रस्त्यांची कामे करण्यात आली नाही. तर ममदापूर ग्रामस्थांकडून प्राधिकरणा विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ममदापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पुंडलीक सिनारे यांच्या कडून इशारा देण्यात आला आहे.
———————————————-
नेरळ विकास प्राधिकरणा अंतर्गत नेरळ, कोल्हारे व आमची ममदापूर ग्रामपंचायत येत असुन, नेरळ ग्रामपंचायत व कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील सुरू असलेल्या गृहप्रकल्पांची कामे पाहाता जास्त प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे ही आमच्या ममदापूर ग्रामपंचायती मध्ये सुरू असुन, ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील सुरू असलेल्या गृहप्रकल्पांच्या कामांच्या परवानगी पोटी बांधकाम व्यावसायीकांकडून कर स्वरूपात भरला जाणारा पैसा हा वर्षा पोटी साधारण ६० लाखांच्या घरात जात असताना, व ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांना प्राधिकरणाकडून प्रथम प्राधान्य मिळणे क्रमप्राप्त असताना, मात्र प्राधिकरणातील आमच्या ग्रामपंचायतीच्या हक्काचा निधी हा दुसरीकडे वर्ग केला जात असल्याने, आमच्या रस्त्यांची अशी दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांची कामे लवकरात लवरकर प्राधिकरणा मार्फत करण्यात आली नाही. तर ममदापूर ग्रामस्थांकडून प्राधिकरणा विरोधात आंदोलन छेडण्यात येईल.
……पुंडलीक सिनारे, माजी सरपंच ममदापूर ग्रामपंचायत.
———————————————-
नेरळ – ममदापूर या मुख्य रस्त्यावरी तुलसी कार्यालय ते गावापर्यंतच्या उर्वरित राहिलेल्या रस्त्याच्या कामा पैकी पाहिला टप्प्याच्या कामांची वर्कऑडर ही जिल्हा नियोजनातून मंजूर आहे. तर दुसऱ्या टप्प्याच्या मंजूरी कामांसाठी प्राधिकरणा अंतर्गत कामसुरु आहे. त्या कामांला मंजूरी व वर्क ऑडर निघाल्यानंतर दोन्ही वर्कऑर्डरनुसार सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल.
……सतीश जगताप, इंजिनीयर, नेरळ विकास प्राधिकरण विभाग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading