नेरळ मधिल खांडा येथील टिवाले हॉटेल येथे असलेल्या शितपेय हातगाडीचा शॉक लागून एका सहावर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू पावलेल्या चिमुकलीचे नांव रायमिन रफिक खान असे आहे. या घटनेस हॉटेल चालक व शीतपेय हातगाडी मालक यांचा निष्काळजीपणा ठरला आहे का? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. तर मृत चिमुकलीचा अंध वडील, आई, लहान बहिण व लहान भाऊ असा परिवार असुन, हे पाच जणांचे कुटुंब नेरळ बाजारपेठ व परिसरात भिक्षा मागून आपली उपजीविका करत असल्याने, या घडलेल्या दुर्देवी घटनेनेमुळे नेरळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटने बाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या चिमुकलीच्या मृत्यूच्या घटनेची नेरळ पोलिस ठाणे उकल करून चिमुकलीच्या मृत्यूस जबाबदार असल्यानवर कारवाई करून मृत चिमुकलीच्या अंध वडिल, आई दोन भावांडाना योग्य न्याय देणार का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी एकीकडे विधानसभा निवडणुक मतदानाची धामधूम सुरू होती. तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या खान कुटुंबाचा संघर्ष सुरू होता. नेरळ पूर्व परिसरात बोपेले हजारे नगर येथे राहणारे अंधत्व असलेले रफिक खान यांची सहा वर्षीय रायमिन या मुलीचा हात शितपेय हातगाडीला हात लावल्यामुळे शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची ही दुर्देवी घटना ही रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेरळ खांडा येथील टीवाले हॉटेल समोर घडली आहे. रफिक रवान यांना अंधत्व असल्याने त्यांच्या सह त्यांचे कुटुंब पत्नी, दोन लहान मुली व एक लहान मुलगा असे मिळून नेरळ बाजारपेठ व परिसरात भिक्षा मागून आपली गुजरान करीत होते.
नेहमी प्रमाणे पोटाची खळगी भरण्यासाठी निघेलेले पीडित कुटुंब हे नेरळ बदलापूर राज्य मार्गावरील नेरळ खांडा येथील नेरळ ममदापूर चौकात असलेल्या सरफराज टिवाले यांचे टीवाले फॅमिली हॉटेल येथे आले असता. टीवाले हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे लावलेल्या शीतपेय हातगाडीला त्यांची सहा वर्षीय रायमिन नांवाच्या मुलीने हात लावताच विजेचा झटका बसला असता, ती बेशुद्ध अवस्थेत चिटकून उभ्या असलेल्या स्थितीत व कोणती हालचाल होत नसल्याचे दिसताच मुलीच्या आईने हंबरडा फोडला असता, तिथे असलेल्या नागरिकांनी त्या मुलीची सुटका करत त्या मुलीला उपचारा करीता खांडा येथील डॉ.शेवाळे यांचे रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टर यांनी या मुलीला मृत घोषित केले.
या घटनेची खबर नेरळ पोलीस ठाण्यात दीली. तर मृत मुलीची आई पराविन रफिख खान वय वर्ष ३५ हीने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या प्रमाणे नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यू रजिस्टर नं. ४५/२०२४ बि. एन. एस कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आलेली आहे. तर पुढील तपास हा नेरळ पोलीस ठाण्यातील उपनिरिक्षक ज्ञानदेव दाहातोंडे हे करीत आहे.
—————————————
नेरळ – कल्याण राज्य मार्ग हा १४० फुट रुंदी करण असा मंजूर असताना, शासनाचे नियम धाब्यावर बसून रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे व्यवसाय सुरू केले जात असून यावर कोणाचा अंकुश राहिलेला नाही.त्यातच हॉटेल धारक ही शासनाचे नियम पादळी तुडवत अशा हातगाड्या चालकांना अभय देताना दिसत असल्याचे चित्र स्पष्ट होत असल्याने, व त्यामध्येच महावितरण कंपनीची दिशाभूल करीत कधी वीज चोरी तर कधी अनधिकृत वीज जोडणी करून वीज पुरवठा करणे हे प्रकार सर्रास समोर येत असतानाच आज घडलेली ही घटना येणाऱ्या काळात मोठी समस्या बनणार असल्यामुळे अशा बेजबाबदार व हलगर्जीपणा करणाऱ्यांमुळे आज ही घटना घडून सहा वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूस हॉटेल चालक व शितपेय हातगाडी चालक यांचा निष्काळजीपणा ठरला आहे का? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात असुन, या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हॉटेल चालक, शीतपेय हातगाडी धारकावर नेरळ पोलीस कोणती कारवाई करतात, तसेच महावितरण अधिकारी देखील यावर कोणती कारवाई करणार, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.