नेरळमध्ये डासांचा प्रचंड प्रादुर्भाव; ग्रामपंचायत प्रशासन मात्र सुस्त

नेरळ ग्रामपंचायत विसर्जित
कर्जत (गणेश पवार) : 
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये सध्या डासांचा वाढता प्रादुर्भाव असुन, तर दुसरीकडे नेरळमध्ये विषमज्वर (टाईफाईड) आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत. या मात्र या डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीकडून औषध व धुरफवारणी होत नसल्याची परिस्थिती असल्याने माात्र नागरिक हे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. ही परस्थिती पाहता नेरळ ग्रामपंचायत प्रशासन सुस्त का? असा प्रश्न मात्र नागरिकांनकडून उपस्थित केला जात आहे.
सहा महिन्या पूर्वी नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुनी बाजारपेठ येथील राहणारे नामांकित व्यक्ती रफिक अत्तार यांचा २५ वर्षीय मुलगा मुस्तफा उर्फ राजू रफिक अत्तार याचा डेंग्यु सदृश आजाराने दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी तर दि. २ ऑक्टोंबर रोजी योगीनी आमित पोतदार वय वर्ष – ३३ या महिलेचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रा कडून नेरळ ग्रामपंचायतीला नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी प्रती औषध व धुर फवारणी करण्यासाठी पत्र दिले होते. त्यानुसार त्यावेळी नेरळ ग्रामपंचायतीकडून नेरळ ग्रामपंचायत हद्दीत औषध व धुर फवारणी करण्यात आली होती.
यासाठी नेरळ ग्रामपंचायतीला कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांनी मोलाचे सहकार्य केले होते. तर सध्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये डासांचा संख्या वाढली असुन, या वाढत्या डासांमुळे नेरळ मधील नागरिक मोठया प्रमाणात त्रस्त झाले आहे. तर दुसरीकडे दुसरी कडे नेरळमध्ये विषमज्वर (टाईफाईड) आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत. तर विषमज्वर (टाईफाईड) हा आजाराचा प्रसार हा दुषित पाणी व दुषित अन्नामुळे होत असल्याने, या संदर्भात नेरळ प्राथमिक आरोग्य केंदातील आरोग्य कर्मचारी वर्गाकडून ताप सर्वेक्षण व पाण्याची ओ टी तपासणीचे काम सूरू केले असता, नेरळ मध्ये बहुतेक ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे अढळून आले असुन, त्या पाण्याची ओ टी बाबत तपासणी केली असता, त्याचे प्रमाण अयोग्य व शुद्धीकरणाचा अभाव दिसत असल्याने, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत नेरळ ग्रामपंचायतीला दि.२३ जानेवारी २०२५ रोजी पत्राव्दारे पिण्याच्या पाण्यामध्ये नियमित टी सी एल टाकूण नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा तसेच विषमज्वर (टाईफाईड) या आजाराला प्रतिबंधक करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये दवंडीच्या माध्यमातून पाणी उकळून व गाळून पिण्यास तसेच उघडे व शिळे अन्न खाण्यास टाळण्या संदर्भातील नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
मात्र सहा महिन्या पूर्वी डेंग्यु सदुश्य आजाराने झालेले दोन जणांच्या मुत्यूच्या घटने प्रसंगी नेरळ ग्रामपंचायतीकडून झालेली औषध व धुर फवारणी त्यानंतर सध्य नेरळमध्ये असलेला डासांचा वाढता प्रादुर्भाव पहाता व या डासांमुळे त्रस्त असलेले नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी प्रती मात्र नेरळ ग्रामपंचायती कडून औषद व धुर फवारणी होत नसल्यामुळे तसेच तसेच विषमज्वर (टाईफाईड) या आजाराला प्रतिबंधक करण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नागरिकांच्या प्रबोधना करीता दवंडीच्या पत्राचा ही विसर हा नेरळ ग्रामपंचायतीला विसर पडल्याचे चित्र समोर येत असल्याने मात्र नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा ऐरणीवर असल्याचे वास्त समोर येत असल्यामुळे नेरळच्या नागरिकांच्या आरोग्याविषयी नेरळ ग्रामपंचायत प्रशासन सुस्त का? असा प्रश्न मात्र नागरिकांनकडून उपस्थित केला जात आहे.
————————————-
नेरळ ग्रामपंचायतीचा फवारणी गाडी बंद असून, सोमवारी गाडीची व्यवस्था करून औषध व धुर फवारणी ही सुरू करण्यात येईल.
……कार्ले, ग्रामसेवक, नेरळ ग्रामपंचायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading