कर्जत ( गणेश पवार ) :
नेरळ ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे नागरी सुविधा पुरवण्यात अडचणी येत आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा, बंद पथदिवे, कचरा समस्या अशा अडचणींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्यांचे निराकरण आणि ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे केली.
यावेळी तटकरे यांनी महाराष्ट्र सरकारकडे चर्चा करून नगरपंचायत स्थापन करण्याचे आश्वासन दिले.