नेते गेले पण कार्यकर्ते आजही सुरेशभाऊंच्या सोबतच

karjat-ncp
कर्जत ( गणेश पवार ) : महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील ३० आमदार फोडून सत्तेत सहभागी झाले, मात्र आजही कर्जतमधील कार्यकर्ते सुरेशभाऊच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असल्याचे प्रामुख्याने चित्र पाहावयास मिळाले.
महाराष्ट्र राज्यात सत्तेतसहभागी झाल्यानंतर राज्यात मोठी उलथापालथ झाल्याने रायगडमध्ये नेते मंडळीने दुसरा गट स्थापन केले, पण आजहीअनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसाधारण सभेला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थितीत पाहता कर्जत तालुक्यात पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नेत्यांच्या नव्हे तर पाठीवर हात ठेऊन साथ सोबत करणाऱ्या माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या सोबत असल्याचे दिसून आले.
सुरेशभाऊनी साद घातली तर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते हजर होतात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले या सर्वसाधारण सभेत माजी आमदार सुरेशभाऊ लाड, तानाजी चव्हाण, सुरेशदादा टोकरे, माधवीताई जोशी, शरद लाड, रणजित जैन, तहसीन, भाई शंकर भुसारी, उदय पाटील, सागर शेळके, राजू हजारे, रामशेठ राणे, जगदीश ठाकरे, पुष्पाताई दगडे, सुवर्णा नीलधे, मधुरा चंदने, रजनीताई गायकवाड, रेखाताई दिसले, प्रतीक्षा लाड यांच्या सह अनेक प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading