नॅशनल कम्प्युटर पेणच्या सामाजिक उपक्रमांचा वसा : जागतिक महिला दिनाचा उत्साह अन् आरोग्यविषयक मार्गदर्शन

Nca Pen
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
पेण येथे गेल्या 29 वर्षांपासून कार्यरत असलेली नॅशनल कम्प्युटर ही संस्था केवळ संगणक शिक्षणापुरती मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. महाशिवरात्री निमित्त पेणमधील वृद्धाश्रमातील वृद्धांना फळ आहाराचे वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. तसेच, आदिवासी मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या कार्यातही ही संस्था आघाडीवर आहे.
यावेळी दर्शना पारधी, जानवी वाघ, हर्षला भस्मा, अनुजा कारण, पूर्वा पाटील, प्रेरणा निरगुडा, करुणा पिंगळा, योगिनी लेंडी, रुषभू मोरया, श्रावणी कदम, मोहिनी गडकल, जयश्री ठोंबरा, मांजरेकर तनवी, पांगत, नीलम पाटील, साक्षी म्हात्रे, रूपाली डोरे, सरिता पिंगळा, सुमन शीत, प्रमिला शीत, प्रियंका कडू, उषा खंडवी, मानसी ठाकूर, अनिता निरगुडा, पूर्वा म्हात्रे, हर्षला पारधी, वीणा पाटील, डॉ. रूपाली ठाकूर, स्मिता शेळके, संपदा शिरसाट, देवांगना पाटील आदि उपस्थित होत्या  
Nca Pen Mahila Din
जागतिक महिला दिनाचा उत्साह आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन
आज, 8 मार्च 2025, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नॅशनल कम्प्युटर प्रशिक्षण संस्थेतील आजी-माजी विद्यार्थिनींनी एकत्र येत उत्सव साजरा केला. यावेळी महिलांच्या आरोग्य समस्या आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्य बदलाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. रूपाली ठाकूर उपस्थित होत्या.
किशोरवयीन मुलींच्या आरोग्य समस्यांवर महत्त्वपूर्ण सल्ला
किशोरवयात होणारे शारीरिक व मानसिक बदल, पोषण, मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, तसेच मुलींनी आपल्या समस्या योग्य व्यक्तींशी कशा शेअर कराव्यात, यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. बहुतेक मुलींना कोणाकडे आपल्या समस्या मांडाव्यात, हा मोठा प्रश्न असतो. या विषयावर डॉ. रूपाली ठाकूर यांनी स्पष्ट व सोप्या पद्धतीने संवाद साधत मार्गदर्शन केले.
Nca Pen Mahila Din1
नॅशनल कम्प्युटर – केवळ शिक्षण नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था
नॅशनल कम्प्युटर संस्था केवळ एमएस-सीआयटी किंवा संगणक शिक्षणापुरती मर्यादित नसून, समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्यास सदैव तत्पर आहे. महिलांचे आरोग्य, शिक्षण, तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम हाती घेत संस्था सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे.
अशा उपक्रमांमुळे नॅशनल कम्प्युटर ही संस्था केवळ शिक्षण केंद्र न राहता, समाजहिताचा वसा जपणारी संस्था म्हणून नावारूपाला आली आहे.
Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading