
आंगवली ( संदीप गुडेकर ) :
देवरुख नजीक असणारे संगमेश्वर तालुक्यातील नामांकित युवा गणेश मित्र मंडळ निव्याचा राजा गेले 18 वर्षे मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. या मंडळाची स्थापना १८वर्षा पूर्वी गावातील ४५ युवा कार्यकर्ते एकत्र येऊन मंडळ तयार केले. आजपर्यत या मंडळातील युवा कार्यकर्ते मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करताना दिसत आहेत.
या मंडळाने सामाजिक बांधीलकी ठेवून इतिहासीक, धार्मिक, पर्यावरणपूरक अनेक देखावे बनविले आहेत या मंडळाला राज्य शासन पुरस्कार, पोलीस अधिक्षक पुरस्कार, पोलीस स्थानक पुरस्कार, मंगल मूर्ती पुरस्कार, आदर्श मंडळ देवरुख पोलीस ठाणे पुरस्कार, लोकमान्य पुरस्कार प्राप्त असून या मंडळानी यापूर्वी वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता मोहिम,रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शेतकरी मेळावे, पाणी अडवा जिरवा वनराई बांधरे मोहिम, जनजागृती मोहिम विविध कार्यक्रम केले आहेत.
या वर्षी मंडळ वतीने दि.६ रोजी साय.५ वा. सहाण ते मंडप गणेश आगमन मिरवणूक दि. ७ रोजी विधी पूर्वक स्थापना ,दि. ८,९, १० रोजी सुस्वर भजन संध्या, दि., ११ रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर,दि. १२ रोजी श्री.सिद्धेश्वर मधली वाडी याचे सुस्वर भजन, दि.१३ रोजी रात्रौ ९ वाजता महिलाचा फुगंडी कार्यक्रम महिला मंडळ धामापूर विरुद्ध निगुडवाडी मार्लेश्वर दि. १४ रोजी महिला करिता रात्रौ ९ वाजता सर्व महिला भगिनी साठी होम मिनिस्टर, दि. १५ रोजी सकाळी १० वा. सत्य नारायण महापूजा,दुपारी १ वा. महाप्रसाद, सायकांळी ७ वाजता हरि ॐ ऐक्य वर्धक माळवाशी याचा हरिपाठ, रात्रौ ९ वा. स्वागत व सत्कार समारंभ, रात्रौ १० वाजता शक्ती तुरा जंगी सामना बुवा शाहिर शाहिद खेरटकर चिपळूण विरूद्ध बुवा तुषार पंदेरे लाजा दि. १६ रात्रौ ९ वा. मुलांचे विविध कला गुणाचे कार्यक्रम दि. १७ रोजी सायकाळी ४ वाजता विसर्जन मिरवणूक मंडप ते जोशीवाडी या कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा अशी विनंती युवा गणेश मित्र मंडळ निवे बु वतीने करण्यात आली आहे.