नायक मराठा समाज सेवा संघ विन्हेरे विभागाकडून फाळकेवाडी येथील येथे रविवार २ फेब्रुवारी रोजी. महिला हळदी कुंकू समारंभ मेळावा आयोजित केला होता या आशयाचा बॅनर विन्हेरे येथील झोलाई मंदिर देवीच्या सहाने वरती लावण्यात आला होता मात्र अज्ञातांकडून हा बॅनर फाडल्याने विन्हेरे विभागासहित महाड तालुक्यात या घटनेचा निषेध केला मात्र आज सकाळी मराठा समाजाच्या महिला आक्रमक झाले असून पोलीस तपासण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोरच आक्रमक होऊन दोन दिवसात कारवाई करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावा लागेल असा इशारा महाड तालुका पोलिसांसमोर दिल्याने पोलिसांनी तपास वेगाने चालू केला आहे.
नायक मराठा समाज सेवा संघ विन्हेरे विभागामार्फत फाळकेवाडी येथील हनुमान मंदिरामध्ये रविवार २ फेब्रुवारी रोजी महिला हळदी कुंकू समारंभ व मेळावा आयोजित केला होता. यासाठी महाड सह तालुक्यातील विविध विभागातून मोठ्या प्रमाणावर महिला या कार्यक्रमासाठी येणार होत्या त्यासाठी विन्हेरे येथील झोलाई मंदिराच्या सहानेवर हा बॅनर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास लावण्यात आला होता. मात्र शुक्रवारी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक हा बॅनर फाडून पळवून नेला.
याबाबतची घटना शनिवारी सकाळी लक्षात आल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात निषेध करीत महाड तालुका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून आज रविवारी२ फेब्रुवारी रोजी महाड तालुका पोलीस विन्हेरे येथे तपासासाठी आले असता मराठा समाजाच्या जमलेल्या महिला आक्रमक झाल्या व त्यांनी पोलिसांना इशारा देत दोन दिवसात आरोपींना अटक करा अन्यथा आम्ही रस्त्यावर करण्याचा इशारा या मराठा समाजाच्या महिलांनी दिल्याने पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला असून या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा व लोकांकडून याबाबत माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत विन्हेरे येथे नायक मराठा समाजाच्या वतीने शनिवारी बैठक घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला व महाड तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्या बाबतचा तक्रारी अर्ज दाखल केला होता त्या अनुषंगाने आज महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हे आपल्या कर्मचाऱ्यांशहीत तपास कामासाठी आले असता मराठा समाजाच्या महिला आक्रमक झालेल्या दिसल्या.
काल झालेल्या या बैठकीसाठी तालुका उपाध्यक्ष सिताराम कदम, पांडुरंग पवार अध्यक्ष , सुरेश सकपाळ, नामदेव साळुंखे ,प्रभाकर गायकवाड हे सर्व समाजाचे उपाध्यक्ष अनंत सावंत सचिव, संदीप वारंगे सदस्य, बाळकृष्ण जाधव खजिनदार, उमेश फाळके, फाळकेवाडी सरपंच, नागेश फाळके, विजय शिंदे, जितेंद्र वामन माने ,तालुका कृषी समितीचे अध्यक्ष किशोर फाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे ,विन्हेरे सरपंच चंद्रकांत मोरे ,पांगरी चे माजी सरपंच राजेंद्र मोरे, ताम्हणे गावचे माजी सरपंच सुनील बोरकर इत्यादी सदस्य बैठकीस उपस्थित होते.
आज सकाळी विन्हेरे येथील झोलाई मंदिराच्या परिसरात निषेध करून बॅनर पडणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मराठा समाजाच्या महिलांनी केली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.