महायुतीने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करत २८८ पैकी २३५ जागांवर विजय मिळवून प्रचंड बहुमताने सत्ता राखली आहे. भाजपने १३२, शिंदेसेनेने ५७, तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकून सरकार स्थापन करण्याचा मार्ग सुकर केला. तर महायुतीच्या यशात जनसुराज्य पक्षाचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष १, राजर्षी शाहू आघाडी १ व रासपच्या एका जागेचा समावेश आहे.
विधानसभेला कोणी किती जागा लढविल्या आणि जिंकल्या
भाजपा १४९ १३२
शिवसेना (शिंदे गट) ८१ ५७
राष्ट्रवादी (अजित पवार) ५९ ४१
शिवसेना (उबाठा) ९५ २०
राष्ट्रवादी (शरद पवार) ८६ १०
कॉंग्रेस १०२ १६
या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला असून, महायुतीचे नवीन सरकार लवकरच स्थापन होणार आहे. या निवडणुकीत अनेक उमेदवार हे अल्प मतांनी विजयी झाले आहेत त्यातील काही नावे समोर आली आहेत.
निसटता विजय खेचून आणण्यात यशस्वी झालेले उमेदवार :
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून २०८ मतांनी विजयी
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मतदारसंघातून एआयएमआयएमचे उमेदवार १६२ मतांनी विजयी
जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी १२४३ मतांनी आपली जागा राखली.
नवी मुंबईतील बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे अवघ्या ३७७ मतांनी विजयी
शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड ८४१ मतांनी विजयी
राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघातून १५२३ मतांनी विजयी
महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत परंडा मतदारसंघातून १५०९ मतांनी विजयी
महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे उमेदवार अतुल सावे औरंगाबाद पूर्व मतदार संघातून २१६१ मतांनी विजयी
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.