आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) तारतात्री विभागाला थर्ड आय फॉर ब्लाइंड या प्रोजेक्टचे अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनामध्ये निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरांवरून अभिनंदन होत आहे.
कुर्ला – मुंबई येथील डॉन बॉस्को खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये बुधवार 12 फेब्रुवारी रोजी मुंबई विभागीय स्तरावर आयोजित केलेल्या तंत्र प्रदर्शनात नागोठणे येथील आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (आयटीआय) तील थर्ड आय फॉर ब्लाइंड या प्रोजेक्टचे अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनामध्ये निवड करण्यात आली.
तारतात्री विभागातील शिल्पनिदेशक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नीरज पाटील, प्रिन्स गावंड, सानिया म्हात्रे व वैष्णवी पवार या विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल प्रशांत पाटील व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या प्राचार्या विद्या पाटील,सर्व शिक्षक,शिक्षकेतर व कर्मचारी यांच्यासह विभागातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.