डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात सालाबादप्रमाणे शनिवार 26 एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी सार्वजनिक जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमात सकाळी बुद्ध पुजा पाठ करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दुपारी शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे शहरातील चौका चौकात तसेच बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाबाहेर सरपंच सुप्रिया महाडीक,ग्रा.प. सदस्य ॲड.प्रकाश कांबळे,ग्रा.पं.सदस्या- अमृता महाडिक,शहनाज अधिकारी, शबाना मुल्ला, ज्योती राऊत,पुनम इप्ते यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. तसेच पोलिस ठाण्यात सहा.पो.नि.सचिन कुलकर्णी साहेब व सहकार्यांनी मिरवणुकीचे स्वागत करून बाबासाहेबांना अभिवादन केले.
डॉ.सिध्दार्थ शिनगारे संस्थापक/अध्यक्ष भारतीय हितकारणी सभा, महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली. सरपंच सुप्रिया महाडिक,सर्व सदस्य तसेच प्रा.सुनिल देवरे, एस एन गायकवाड,चंद्रकांत गायकवाड, संतोष गायकवाड, भगवान बिनेदार, साहिल म्हात्रे,डॉ.श्रीकृष्ण तुपारे, डॉ.विजय चव्हाण, जितेंद्र गायकवाड, पत्रकार धम्मशिल सावंत,नरेश गायकवाड, बौद्धाचार्य विलास कांबळे,संदिप मोहिते,प्रा. बबन झेंड, देवता भंडारे आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तावना ॲड.प्रकाश कांबळे तर सुत्रसंचलन प्रभाकर ओव्हाळ यांनी केले. सदरील कार्यक्रमात या वेळी एस एन गायकवाड यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.रात्री प्रबोधनपर भिमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अध्यक्ष संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश शेलार, दिलीप दाभाडे, दिपक दाभाडे,किसन शिर्के, आकेश गायकवाड,अरविंद गायकवाड, विकास जाधव, काशिनाथ दाभाडे,विलास कांबळे, सतेज दाभाडे, जितेंद्र गायकवाड,देवराम कांबळे,मोरेश्वर सगने, अशोक गायकवाड,मयुर गायकवाड, साहिल जाधव,वृतीक दाभाडे, स्वप्निल मोरे,विजय शिर्के, सुरेश कांबळे, सुमित दाभाडे,दिलीप गायकवाड, स्वप्निल शिर्के,सुजित शेलार, आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.