नागोठणे ( महेंद्र माने ) :
विधानसभा पंचवार्षिक निवडणूक मतदान बुधवार 20 नोव्हेंबर रोजी पार पडली.191 पेण सुधागड रोहा मतदार संघातुन महायुतीचे भाजपा उमेदवार रविशेठ पाटील हे 60,677 मतांच्या फरकाने निवडून आले असून या संघातील नागोठणे शहरात एकुण साधारण 9102 मतदारांपैकी 5938 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने साधारण 65 % मतदान झाले. यामध्ये नागोठणे शहरातून रविशेठ पाटील यांना त्यांनी दिलेल्या भरघोस निधीची परत फेड म्हणून 236 मतांची आघाडी दील्याबद्दल सर्व मतदार बंधु भगिनींचे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्तेच्या वतीने आभार व्यक्त करीत असल्याचे भाजपा शहर अध्यक्ष सचिन मोदी यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना सचिन मोदी यांनी सांगितले की, या पंचवार्षिक निवडणूकीत पेण सुधागड रोहा मतदार संघातील नागोठणे शहरात एकुण साधारण 9102 मतदारांपैकी 5938 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये 1) बूथ क्र. 01 मध्ये 908 मतदाराने आपला हक्क बजावला 2) बूथ क्र.02 मध्ये 682 मतदाराने आपला हक्क बजावला, 3) बूथ क्र. मध्ये 693 मतदाराने आपला हक्क बजावला,4) बूथ क्र.04 मध्ये 459 मतदाराने आपला हक्क बजावला, 5) बूथ क्र.05 मध्ये 492 मतदाराने आपला हक्क बजावला 6) बूथ क्र.06 मध्ये 601 मतदाराने आपला हक्क बजावला 7) बूथ क्र.07 मध्ये 438 मतदाराने आपला हक्क बजावला 8) बूथ क्र.08 मध्ये 684 मतदाराने आपला हक्क बजावल्या 9) बूथ क्र.09 मध्ये 286 मतदाराने आपला हक्क बजावला 10) बूथ नं. 10 मध्ये 695 मतदाराने आपला हक्क बजावल्याने नागोठणे शहरात 65.23 % मतदान झाले आहे.
यामध्ये शहरातून रविशेठ पाटील यांना 236 मतांची आघाडी मिळाली असून बूथ क्रं. 08 व 09 मध्ये सर्वाधिक एक नंबरची मते मिळाली आहेत. रविशेठ पाटील यांनी कोणताही दुजाभाव न करता शहराला भरघोस दीलेल्या निधीची परत फेड म्हणून त्यांना शहरातून आघाडी दिल्याबद्दल सर्व मतदार बंधु भगिनींचे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्तेच्या वतीने आभार व्यक्त करीत असल्याचे सचिन मोदी यांनी सांगितले.