सुकेळी ( दिनेश ठमके) :
सद्यपरिस्थितीत सर्वांनाच मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्रचारासाठी कंबर कसली आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात महत्वाची अशी लढत होणा-या १९१ पेण- सुधागड- रोहा मतदार संघामध्ये तिरंगी लढत होणार असुन या मतदार संघातुन महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रविशेठ पाटील यांना नागोठणे विभागातुन प्रचंड मताधिक्य मिळवून देणार असल्याचे भाजपचे रोहा तालुका सरचिटणीस एकनाथशेठ ठाकुर यांनी बोलताना सांगितले.
मागिल ५ वर्षांत महायुतीने जनतेसाठी केलेली लोकोपयोगी कामे व रविशेठ पाटील यांचा असणारा झंझावात तसेच राजकारणातील असणारा दांडगा अनुभव हीच रविशेठ पाटील यांच्या विजयाची पोहच पावती आहे. संपूर्ण राज्यामध्ये महायुतीला अतिशय चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याचे कारण म्हणजे राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजना. यामध्ये प्रामुख्याने महिलांना बससेवा अर्धा तिकिट, लाडकी बहिण योजना, शेत पिकाला प्राधान्य अशा अनेक योजना आणत असतानांच यापुढे देखिल विविंध योजना आणण्यासाठी मतदारांच्या मनात बसलेले हे सरकार पुन्हा राज्यात येणार असुन येणारं सरकार तरुणांच्या हाताला रोजगार व व्यवसाय उपलब्ध करणार आहे.
तसेच महायुती आघाडीत असलेले मित्र पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, व रिपाइं आठवले गट हे अतिशय जोमाने काम करतांना पहावयास मिळत आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांचा पेण- सुधागड -रोहा मतदार संघात झंझावत वाढला असुन नागोठणे विभागातुन रविशेठ पाटील यांना प्रचंड मतांची आघाडी मिळवून देणार यामध्ये तीळमत्र शंका नसल्याचे भाजपचे रोहा तालुका सरचिटणीस एकनाथशेठ ठाकुर यांनी सांगितले.