पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेण तालुक्यातील रिलायन्स वसाहत जुना बी 30 ,बेणसे मधील मनाली सहस्त्रबुद्धे यांच्या घरी एक लाख 40 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले असून सदरील आरोपीला नागोठणे पोलिसांनी चार तासांच्या आत जेलबंद केले असून त्यांच्या या धाडसाचे विभागात कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बेणसे येथील रिलायन्स वसाहत जुना बी 30 येथील मनाली मिलिंद सहस्त्रबुद्धे यांच्या राहत्या घराच्या गुरुवार 06 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 ते 10.00 वाजण्याच्या दरम्यान घराच्या उघड्या दरवाजा वाटे आज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून एका बेडरुममध्ये फिर्यादी यांची मुलगी झोपलेली असल्याचा फायदा घेवून दुस-या बेडरुममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यातील लॉकरमधील जुने वापरलेले किंमत अंदाजे 1) 80,000/- किंमतीचे सुमारे 09 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याच्या छोटया वाटया असलेले व त्यामध्ये सोन्याचे व काळे मनी असलेले एक सरी मंगळसुत्र,2) 40,000/- किंमतीचे सोन्याचे कानातले04 ग्रॅम वजनाचे झुमक्याचे जोड त्यात मध्यभागी लाल बारीक खडा,3) 10,000/- किंमतीचे मध्ये मनी असलेले दोन जोड चांदीचे पैंजन,4) 10,000/- किंमतीचे एक चांदीचा जास्वंद फुलाच्या आकाराचा एक मोठा व बाकी लहान चांदीची -फुले असलेला हार असे एकुण एक लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले.
याची खबर पोलिसांना मिळताच सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा तपास करण्याबाबतचे सहा.पो.नि. सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एएसआय प्रमोद कदम, पोलीस हवालदार महेश लांगी व पोलीस कॉन्स्टेबल हंबीर यांनी तात्काळ तेथील काम करणारे व इतर लोकांकडे चौकशी करून त्या आधारे अज्ञात आरोपीत महिला तिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे सखोल चौकशी करून चोरीस गेलेले 1,40,000/- सर्व सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
याबाबत नागोठणे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 07/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 हा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रमोद कदम करीत आहे.सदरचा गुन्हा चार तासांच्या आत उघड करून आरोपीला जेलबंद केल्या बद्दल सहा.पो.नि. सचिन कुलकर्णी व त्यांच्या टीमचे नागोठणे शहर व विभागात कौतुक होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.