श्री.रामचरित मानस सेवा संस्थेच्या वतीने ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणात 22 वा श्री भागवत कथा सप्ताह सोमवार 20 जानेवारी ते रविवार 26 जानेवारी या कालावधीत समारोप झाला.
या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात शनिवार 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5.00 ते रात्री 08.00 वा.पर्यंत कलश शोभा यात्रा संपूर्ण शहरात फिरवीण्यात येणार आहे. सोमवार 20 ते रविवार 26 जानेवारी दरम्यान दररोज सायं. 7.00 ते रात्री 10.00 वा. दरम्यान आचार्य श्री मारुति नंदन महाराज यांचे श्री राम कथेवर संगीतमय भागवत कथा प्रवचन करण्यात येणार आहे. यामध्ये सोमवार 20 जानेवारी रोजी श्री गणेश पुरन श्रीमद्भागवत महात्म्य एवं गोकर्णोपाख्यान शुकदेव चरित्र सप्ताह यज्ञ कथा श्रवण विधि वर्णन,मंगळवार 21 जानेवारी रोजी सृष्टी की उत्पत्ति, विदुर चरित्र, कपिल देवहूति संवाद, वाराहा अवतार,बुधवार 22 जानेवारी रोजी ध्रुव चरित्र, मोहिनी अवतार, गजेन्द्र ग्राह उध्दार, श्री वामन अवतार (झाँकी श्री वामन भगवान की), 23 जानेवारी रोजी दुर्वासाजी की दुःख निवृत्ति, सुर्यवशी एवं चंन्द्रवंश वर्णन, श्रीकृष्ण जन्मा महोत्सव (झाँकी श्री बालकृष्ण जी की),शुक्रवार 24 जानेवारी रोजी श्रीकृष्ण बाल लीला, पुतना वध, नृणावर्त उध्दार, गोकुल लीला (झाँकी श्री माखन चोर की),शनिवार 25 जानेवारी रोजी रास लीला, गोपी उध्दव संवाद, कंस उध्दार, श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह,(झाँकी श्रीकृष्ण – रुक्मिणी जी की) अखण्ड श्रीरामचरितमानस पाठ शुभारंभ प्रात:, रविवार 26 जानेवारी रोजी श्री सुदामी परिन, राजभुषा यज्ञ, श्री मार्कण्डेय चरित्र, श्रीमद्भागवत कथा सारांश,मानस प्रात,पर्णाहुति देण्यात आल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माजी जि.प. सदस्य किशोर जैन, सरपंच सुप्रिया महाडीक,माजी सरपंच डॉ.मिलिंद धात्रक,ग्रा.प.सदस्य – ज्ञानेश्वर साळुंखे,सचिन ठोंबरे,अॅड.प्रकाश कांबळे,ग्रा.पं. सदस्या पूनम काळे,भविका गिजे,अमृता महाडीक यांच्यासह दिनेश घाग,संतोष चितळकर,प्रथमेश काळे,रोहिदास हातलोनकर,अनिल महाडीक,भारत गिजे यांच्यासह यांच्यासह हजारो भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विनोद दुबे व सचिव पप्पूशेठ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष राजकुमार गुप्ता,कोषाध्यक्ष ए.के.मिश्रा, संचालक बिदेशी यादव व रामचंद्र चौबे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी अपार मेहनत घेत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.