भाजपा नागोठणे शहर व विभागाच्या वतीने रविवार 06 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा 45 वा स्थापना दिन शहरात प्रभात फेरी काढून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर व श्रेया कुंटे, रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड व एकनाथ ठाकूर, शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्यासह अनंता वाघ, सिराज पानसरे, शीतल नांगरे, अपर्णा सुटे, अशोक अहिरे, गौतम जैन, तिरत पोलसानी, संतोष लाड, शेखर गोळे, रऊफ कडवेकर, राजन दुबे आदीसह विभागातील भाजपा पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थापना दिनानिमित्त डॉ. कुंटे यांच्या निवासस्थानापासून भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो च्या जय घोषात शहरात प्रभात फेरी काढण्यात आली.
सदरील प्रभात फेरी ही छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, खूमाचा नाका गांधी चौक मार्गे मोदी पार्क येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आल्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सोपान जांभेकर यांनी भाजपाचा 1980 पासून आज पर्यंतचा इतिहास थोडक्यात सांगून सुरूवातीला 1984 साली दोन खासदार असलेला आपल्या पक्षाचे आज 303 खासदार आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतात आजचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचा आनंद होता आहे.
श्रेया कुंटे यांनी आज आपल्या पक्षाचा 45 वा स्थापना दिन व रामनवमी एकाच दिवशी आलेला योग हा आपल्यासाठी शुभ संकेत असल्याचे सांगितले. आनंद लाड यांनी आपल्या सूत्रसंचालनात भाजपाने स्थापना दिनापासून आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती देऊन आपण सर्व जण एकत्र येऊन आजचा स्थापना दिन आनंदात साजरा करीत असल्याचे सांगितले. सचिन मोदी यांनी आपल्या देशात भाजपाची तिसर्यांदा सत्ता येत असून या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी जनहिताचे निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे सांगितले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.