नागोठणे येथून 56 वर्षीय इसम बेपत्ता

नागोठणे येथून 56 वर्षीय इसम बेपत्ता
नागोठणे (महेंद्र माने) :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून शुक्रवार 21 मार्च रोजी सकाळी साधारण 7.30 वाजण्याच्या सुमारास पनवेलकडे जाण्यास निघालेला 56 वर्षीय एक इसम बेपत्ता झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, खबर देणारे ललित जाधव रा. शिरपूर ता.आर्णी जि. येवतमाळ सध्या रा.लोहगाव, ता. जि.पुणे याचे वडील वासुदेव हरसिंग जाधव वय 56 वर्षे हे त्याच्या गावातील बळीराम राठोड यांचे सोबत एक्सल कंपनी धाटाव-रोहा येथे पेटींगच्या कामा करीता पाच दिवसापुर्वी गावावरुन रोहा येथे आले होते. पंरतु त्यांना काम न मिळाल्यामुळे ते त्याचे मित्र बळीराम राठोड यांचे फोनवरुन त्यांचा मुलगा ललित फोन करुन सांगितले की, मी गावी परत यायला पनवेल येथे येतो तुम्ही मला पनवेल येथे नेण्यास या. त्यांनतर वासुदेव जाधव यांनी नागोठणे येथे आल्यावर एका ट्रक ड्रायव्हर यांचे मोबाईल फोनवरुन ललितला फोनकरुन सांगितले की, मी आता हायवे नाका नागोठणे येथे पोहचलो असून मी बस पकडुन पनवेल येथे येत आहे. परंतु ते पनवेल येथे अदयाप पर्यंत पोहचलेले नाही. 
सदर वासुदेव जाधव यांचे वय 56 वर्षे, उंची 5 फुट 7 इंच, अंगाने मध्यम, चेहरा-गोल, केस काळे, रंग सावळा, डोक्याच्या समोर टक्कल पडलेली, अंगात फुल पॅन्ट व हाफ शर्ट तसेच पायात चप्पल घातली असून याबाबत ललित जाधव यांनी वडील हरविल्याची तक्रार नागोठणे पोलिस ठाण्यात दिली आहे.
पुढील तपास महिला पोलिस हवालदार दीपाली पाटील करीत आहेत.सदरील वर्णनाची व्यक्ति बद्दल कुणास माहिती असल्यास किंवा कुठे पाहिले असल्यास नागोठणे पोलिस ठाण्यात किंवा 8010076878 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन म.पो.हवा. दीपली पाटील यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading